(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- घुग्घुस येथील घरातुन खर्रा विक्री जोमाने सुरू आहे. खर्रा शौकीन खर्रा विकत घेण्यासाठी घरी येत आहे. खर्रा विक्रीते आपल्या राहते खर्रा बनवून विकत आहे. सकाळ पासुनच खर्रा विक्रेत्यांच्या घरी ग्राहकांच्या दुचाकी च्या रांगा लागत आहे.
दुचाकी च्या रांगा लागत असल्याने रस्त्यावरुन ये-जा करणा-या महिला व पुरुषांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
युवकांच्या टोळ्या जमा होत गर्दी केली जात आहे घरा शेजारच्या महिला व मुलींना त्यांच्या चिडीमारीचा त्रास सहन करावा लागत आहे. आडवडी बाजारातील
जुन्या सरकारी दवाखान्या मागे एका घरातुन मोठ्या प्रमाणात खर्रा विक्री सुरू आहे.
पोलीस प्रशासनाने कारवाही करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.