Click Here...👇👇👇

घुग्घुस येथील शास्त्रीनगर शिवसेना शाखा प्रमुख पदी अजय राय यांची नियुक्ती.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 05, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- घुग्घुस येथील गांधी चौकात नियुक्ती पत्र देऊन शास्त्रीनगर शिवसेना शाखा प्रमुख पदी अजय त्रिवेणी राय यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

हि नियुक्ती मा. शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुर शिवसेना जिल्हाप्रमुख संदीपभाऊ गिर्हे व तालुका प्रमुख संतोष भाऊ नरुले यांच्या आदेशाने व घुग्घुस शिवसेना शहरप्रमुख बंटीभाऊ घोरपडे यांच्या हस्ते शास्त्रीनगर शिवसेना शाखा प्रमुख पदाचे अजय त्रिवेणी राय यांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

यावेळी घुग्घुस शिवसेना शहरप्रमुख बंटीभाऊ घोरपडे यांनी हि नियुक्ती शिवसेना पक्ष संघटना वाढविण्यासाठी व आपल्या प्रभागात लोकहित समजुन कार्य करुन शिवसेना पक्ष संघटनेला बळकटी देण्यासाठी कार्य करावे असे मनोगत व्यक्त केले.

नियुक्ती पत्र देतांना घुग्घुस शिवसेनेचे जेष्ठ नेते बाळुभाऊ चिकनकर, उप शहरप्रमुख योगेश भांदककर, युवासेनेचे चेतन बोबडे व शिवसैनिक उपस्थित होते.