घुग्घुस येथे धिवरभोई समाजाच्या वतिने वाल्मिकी जयंती साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase.    Oct 31, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस, चंद्रपुर
चंद्रपूर:-  येथील ग्रामपंचायत कार्यालयात वाल्मिकी जयंती साजरी करण्यात आली. चंद्रपूर भाजपा जिल्हाअध्यक्ष देवराव भोंगळे व घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे यांनी महर्षी वाल्मिकी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.


यावेळी मनोगत व्यक्त करतांना घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे म्हणाले महर्षी वाल्मिकी हे रामायणाचे रचेते आहे. त्यांनी रामायणातुन जगाला जिवनाचा सार्थ सांगितला. प्रभु रामाचे चरित्र व माता सितेचा रामायनाच्या माध्यमातून बोध लिहला. कलयुगात माता, पिता,भाऊ, बहिन व मित्रांशी वागणुक कशी असावी हे आपल्याला रामायनातुन शिकायला मिळते असे मनोगत व्यक्त केले.
 यावेळी चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, धिवरभोई समाजाचे सतिश कामतवार, बबन पारशिवे, अशोक कामतवार, अमोल मांढरे, सारंग कामतवार, बबलु सातपुते उपस्थित होते.