Click Here...👇👇👇

परमपूज्य शेषराव महाराज यांची २० वी पुण्यतिथी साजरी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 06, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- परमपूज्य शेषराव महाराज व्यसमुक्ती संघटना गोंडपिपरी येथे दिनांक ६/१०/२०२० रोजी व्यसनमुक्ती भवनाचे प्रांगणात पुण्यतिथि साजरी करण्यात आली
कार्यक्रमाला उपस्थित श्री. सुरेशराव चौधरी सभापती कृ.उ.बा.स. गोंडपिपरी, श्री. बबनजी निकोडे अध्यक्ष भा.ज.पा.ता. गोंडपिपरी, श्री. मनिष वासमवार सदस्य प.स. गोंडपिपरी, श्री निलेश संगमवार भाजपा नेते, श्री गणपती चौधरी तालुका अध्यक्ष प.पू. शेषराव महाराज व्य. समिती गोंडपिपरी, श्री. निलेश पुलगमकार सचिव यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न झाला त्या वेळी श्री तुळशीराम आऊतकर रा. दरुर यांनी शेषराव महाराज यांची प्रतिमा तयार करून दिले त्याबद्दल त्यांच्या शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सत्संग व वृक्ष रोपनाचा कार्यक्रम घेण्यात आला या प्रसंगी गोंडपिपरी व पोंभुर्णा तालुक्यातील २०० च्या वर शिवभक्तांनी वैशाली डिस्टंसिंग पाळत महाराजांच्या फोटोचे दर्शन घेतले. त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले.
            कार्यक्रमाला प.पू. शेषराव महाराज व्यसनमुक्ती संघटनेचे पदाधिकारी श्री गणपती चौधरी, श्री निलेश पुलगमकार, संतोष वाट, शंकर बोरकुटे, सुनिल भोयर, मुन्ना सिडाम, कोसरे सर, सोनवाणे सर, प्रमोद ठुसे, विलास नागापुरे, सुभाष आदेवार, निरंजन खांडरे, विजय गोहने, पुरषोत्तम ठाकूर यासह अनेक शिवभक्त उपस्थीत होते.