खासदार अशोक नेते यांचे हस्ते तहसिलदारांंना निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- भारतीय जनता पार्टी शाखा सावली चे वतीने महाराष्ट्र सरकारने केंद्र शासनाच्या विधेयकाला विरोध दर्शविला असल्याने भारतीय जनता पार्टी शाखा सावली च्या वतीने महाराष्ट्र सरकारचा तीव्र निषेध करून केंद्र शासनाने लागू केलेल्या विधेयकाची त्वरित अमलबजावणी करण्यात यावी तसेच तालुक्यातील विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी सावली तहसील येथे निवेदन देण्यात आले.
महाराष्ट्र सरकारने केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या कायद्याची अंमलबजावणी करावी. जेणेकरून महाराष्ट्रतील शेतकर्यांना याचा फायदा होईल.
तर मागील महिन्यात सावली तालुक्यातील आलेल्या कृत्रिम पुरामुळे शेतकर्यांचे पिक उद्धवस्त झाले,घरे पडली, शेती उपयोगी साहित्य वाहुन गेले परंतु झालेली नुकसान भरपाई अजून पर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे शेतकर्यांनी जगावे की मरावे असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. राज्य सरकारने घोषित केलेल्या कर्जदारांना प्रोत्साहनावर 50,000 हजार रुपये अजुनपर्यत मिळाले नाही. आपल्या तालुक्यातील अनेक शेतकरी कर्ज माफी पासून वंचित आहेत. अशा शेतकर्यांची कर्ज माफी करण्यात यावी अशा अनेक मागण्या घेऊन आंदोलन करण्यात आले. यावेळी क्षेत्राचे खासदार अशोक नेते, अविनाश पाल तालुका अध्यक्ष भाजपा सावली, सतिशभाऊ बोम्मावार महामंत्री, अर्जुनजी भोयर कोषाध्यक्ष, संतोषभाऊ तंगडपल्लीवार माजी सभापती अर्थ,बांधकाम व नियोजन जि.प.चंद्रपुर,
प्रकाश गड्डमवार, रविभाऊ बोलीवार उपसभापती पं.स.सावली, छायाताई शेंडे पं.स.सदस्य, योगिताताई डबले जि.प.सदस्य, विनोद धोटे, विनोद पा.गड्डमवार, नामदेव भोयर, अशोक नागापुरे, किशोरभाऊ वाकुडकर, मोतीराम चिमुरकर, विशाल करंडे, पद्माकर मराठे, दिवाकर गेडाम, तुळसीदास भुरसे, मानसी लाटेलवार, पुष्पाताई शेरकी, शोभाताई बाबनवाडे आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते...