Click Here...👇👇👇

केंद्र सरकारच्या कृषी विधेयकाच्या कायद्याची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी दिलेली स्थगिती त्वरित उठवावी गोंडपिपरी तालुका भाजपा च्या वतीने निषेध आंदोलन.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 07, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राष्ट्रहित व जनहिताचे केवळ अनेक ऐतिहासिक निर्णयच घेतले नाहीत तर यशस्वी अमलबजावणी करण्याचे कामही केले. आता मोदी सरकारने संसदेच्या दोन्ही सभागृहात ऐतिहासिक कृषी विषयक विधेयक मंजूर करून शेतकऱ्यांच्या जीवनात अमुलाग्र क्रांती घडविनारे पाऊल उचललेले आहे मात्र शेतकऱ्यांबद्दल बेगडी प्रेम असणारी काँग्रेस आणि विरोधक अकारन कांगावा व अप प्रचार करून राजकारण करीत आहे.

                  या नवीन कायद्यामुळे देशातील शेतकरी बंधमुक्त आणि दलालांच्या जोखडातून मुक्त होवून आपल्या कष्टाने पिकविलेल्या शेती मालच्या विक्री व बाजारपेठत स्वातंत्र्य मिळणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक देश, एक बाजारपेठ असणार आहे. आपला शेतिमाल कुठेही आणि योग्य भावात विकन्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे . पंतप्रधान मा. मोदीजीनी एसएमपी कुठल्याही परिस्थितीत बंद होणार नसल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे. या कृषी सुधारणा विधयकामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य प्राप्त होणार आहे .नेहमी शेतकऱ्यांबद्दल पुतण्या मावशीचे प्रेम दाखवून शेतकऱ्यांनी दिलेल्या मतांचा अधिकार काढून घेणाऱ्या महाराष्ट्रातील बेगडी नेत्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून मोदी सरकारने दिलेले शेतकऱ्यांचे स्वातंत्र्य हिरावनारा स्थगिती आदेश काढला आहे . हा स्थगिती आदेश तातडीने रद्द करून केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करणे अत्यंत गरजेचे आहे. केंद्र सरकारच्या कृषी विषयक कायद्याची महाराष्ट्र राज्यात अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने संबंधीत स्थगिती आदेश त्वरित रद्द करण्यात यावा. या विरुद्ध भाजपा गोंडपिपरी तालुक्याच्या वतीने तहसील कार्यालय गोंडपिपरी येथे निषेध आंदोलन करून महविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदविन्यात आला. यावेळी तहसिलदार गोंडपिपरी यांना निवेदन देण्यात आले. आंदोलना दरम्यान उपस्थीत कार्यक्रमाचे नेतृत्व मा. संजय धोटे माजी आमदार, भाजपा तालुकाध्यक्ष बबन निकोडे, निलेश संगमवार भाजपा नेते, सुहास मडूुरवार सामाजिक कार्यकर्ते, सुनिता येग्गेवार प.स. सभापती, अरुण कोडापे प.स.उपसभापती, स्वाती वडपल्लीवार जि.प. सदस्य, अवतरे ताई जि.प. सदस्य, अमर बोडलावार, चेतन सिंह गौर, राकेश पून, संजय झाडे, दिपक सातपुते, मनिष वासमवार, निलेश पुलगमकर, स्वप्निल अनमुलवार, भानेश येग्गेवार, सुनिल फुकट, गणेश डहाळे, प्रशांत येल्लेवार, गणपती चौधरी, रमेश दिंगलवार, गणेश मेरुगवार, मारोती झाडे तसेच भाजपा चे आदी कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.