काँग्रेस नेते जावेद सिद्दीकी यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना सागितले.
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- घुग्घुस ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सप्टेंबर महिन्यात संपताच प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे.
घुग्घुस ग्रामपंचायतीची सदस्य संख्या १७ आहे व एकुण ६ वार्ड आहेत. घुग्घुस हे औद्योगिक शहर आहेत ३२ हजारांच्या जवळपास स्त्रि व पुरुष मतदार आहे.
जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून घुग्घुस ग्रामपंचायतीची ओळख आहे. घुग्घुस ग्रामपंचायतीचे उत्पन्न ही मोठे आहे.
घुग्घुस ग्रामपंचायतीच्या होणाऱ्या संभाव्य पंचवार्षिक निवडणुकांचे वेध सर्वच प्रमुख पक्षाला लागले आहे त्यासाठी आता मोर्चे बांधनीला सुरुवात झाली आहे.
घुग्घुस ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे वारे सुरु झाले आहे.
घुग्घुस येथील काँग्रेसचे नेते जावेद सिद्दीकी हे काँग्रेस पक्षाच्या वतीने घुग्घुस ग्रामपंचायतीच्या संभाव्य निवडणुकीत एकुण ६ वार्डात १७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे करनार आहेत. असे प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलतांना सागितले आहे.