(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- स्थानिक संजय गांधी मार्केट मधील विदर्भ प्रोजेक्ट कार्यालयात कर्मचाऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. पराग मुने ४४ असे मृत कर्मचाऱ्याचे नांव आहे. मात्र आत्महत्येचे कारण अजूनही समजू शकले नाही.
स्थानिक संजय गांधी मार्केट मध्ये विदर्भ प्रोजेक्ट हे बांधकाम ठेकेदाराचे कार्यालय आहे. पराग मुने काही कामानिमित्य घरी गेले व लगेच कार्यालयात पोहचले परंतु, सकाळ पर्यंत पराग मुने घरी न परतल्यामुळे कुटूंबातील सदस्यांनी त्यांचा शोध सुरु केला. पण त्यांचा काही पत्ता लागला नाही.
आज सकाळी जेव्हा विदर्भ प्रोजेक्ट कार्यालय उघडण्यात आले त्यावेळी वरच्या खोलीत पराग मुने हे फासावर लटकलेले आढळले. विशेष म्हणजे त्यांच्या मोबाईल सकाळपर्यंत सुरूच होता. रामनगर पोलिसांनी पंचनामा करीत मृतदेह पुढील तपासणीसाठी सामान्य रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरु आहे.