घुग्घुस येथे गांजा विक्रीने युवावर्ग व्यसनाच्या आहारी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 02, 2020
(आधार न्यूज नेटवर्क शहर प्रतिनिधी) पंकज रामटेके, घुग्घुस
चंद्रपूर:- घुग्घुस शहरात भंगार मोहल्ला, रेल्वेपुल, अमराई, इंदिरा नगर अश्या अनेक ठिकाणी गांजा विक्री जोमात सुरु आहे. गांजाच्या १० ग्रामच्या एका पुढीची किंमत १५० रुपए आहे. सहज गांजा पुढी युवा वर्गाल मिळत असल्याने युवा वर्ग नशेच्या आहारी गेला आहे. ट्रक चालक हि गांजाची नशा करतात नशेत वाहन चालवितांना अनेक अपघात घडले अनेकांचा मृत्यु झाला.

        बाहेरच्या राज्यातुन व जिल्ह्यातुन घुग्घुस येथे गांजा तस्करी केली जाते. युवावर्ग गांजा ची नशा करुन शहरात मुलींची छेड़ काढतात, गुंडागर्दी करनाऱ्यांनी गांजाच्या नशेत शहरात हत्याकांड ही केले.

       घुग्घुस येथील गांजा तस्करांच्या मुसक्या आवळने पोलीसांना अशक्य आहे पोलीसांच्या छत्रछायेत गांजा चा व्यवसाय चांगलाच फोफावत आहे.

       गांजा तस्करांवर कारवाई करनार कोण? असा प्रश्न चिन्ह उपस्थित होत आहे. घुग्घुस येथील गांजा तस्करांवर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे.