(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा येथील राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष रखीबभाई शेख यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमातून आणि सेवाकामातून चुनाळा येथील अनाथ मुलांच्या गौशाळा येथे साजरा करण्यात आला. त्यावेळी अनाथ मुलांना शैक्षणिक साहित्य आणि फळ वाटप करण्यात आले.
हेही वाचा:- गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी.....
ज्या समाजामध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाचं ऋण फेडणे गरजेचे आहे. त्यामुळे या प्रकारचे सामाजिक उपक्रम घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन यावेळी राष्ट्रवादीचे राजुरा शहर उपाध्यक्ष रखीबभाई शेख यांनी केले.
त्याप्रसंगी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संतोषभाऊ देरकर, शहर अध्यक्ष आशिष यमनुरवार, राष्ट्रवादीचे युवक तालुका अध्यक्ष असिफ सय्यद, युवक शहर अध्यक्ष स्वप्नील बाजूजवार, अंकुश भोंगळे, ऑस्टिन सावरकर, संदीप पोगला, सुजित कावळे, गौरव कोडापे तसेच अनेक कार्यकर्ते व मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.