Top News

चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तबाखू,अवैध दारूचा व्यवसाय करणाऱ्यावर कार्यवाही करा.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेनेची निवेदनाद्वारे मागणी.
Bhairav Diwase. Oct 24, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्य सुरक्षा रक्षक व कंत्राटी कर्मचारी सेना जिल्हाध्यक्ष तथा माजी नगरसेवक मा.बंडूभाऊ हजारे यांच्या अध्यक्षतेखाली व संघटनेचे चंद्रपूर शहरप्रमुख मा.कैलासभाऊ तेलतुंबडे यांच्या नेतृत्वामध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील सुगंधित तंबाखू, सुपारी व अवैध दारू(विषारी) यांच्या वाढत्या प्रमाणाने जिल्ह्यातील तरुण युवक कामगार, शेतकरी शेतमजूर यांच्या आरोग्याला घेऊन प्रश्न निर्माण होत असल्याने या अवैध व्यवसाय करणाऱ्यावर कार्यवाही करून चंद्रपूर शहर तसेच जिल्हयातील तरुण युवक कामगार, शेतकरी शेतमजूर, यांना भविष्यात होणाऱ्या आरोग्याविषयक दुष्परिणामा पासून निरोगी राहण्याबाबत चंद्रपूर जिल्हाधिकारी साहेब तसेच सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांना निवेदन देण्यात आले.

हेही वाचा:- गडचिरोली -चंद्रपूर मार्गावर वैनगंगा नदीत प्रेमीयुगलांनी मारली उडी..... 



               चंद्रपूर जिल्हाची महाराष्ट्रातील औद्योगिक जिल्ह्यात उच्च स्तरावर नवीन ओळख असून अनेक लहान-मोठे उद्योग असल्याने इथे कामगार वर्ग फार मोठ्या प्रमाणात असल्याने तसेच शेतकरी शेतमजूर व युवक वर्ग हे नशेच्या आहारी जात असल्याने त्यांच्यावर उपासमारीची परिस्थिती निर्माण होत असून आरोग्याचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे.आधीच जागतिक महामारी (cov_19)कोरोना संकटामुळे येथील कामगार वर्ग देशोधळीला लागलेला असून त्यांना चांगल्या आरोग्यासाठी जिल्ह्यातील व चंद्रपूर शहरात सुरू असलेल्या सुगंधित तंबाखू ,सुपारी ,व अवैध दारू (विषारी) हे विक्री करणाऱ्यावर चौकशी करून त्यांच्यावर कडक कार्यवाही करण्याबाबत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने