चंद्रपूर जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी महिलेचा मृत्यू; रुग्णालयामधील अव्यवस्था चव्हाट्यावर.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Oct 03, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपुरातील कोविड रुग्णालयात रुग्णांची कशी हेळसांड होत आहे. याचा नमुना बघायला मिळत आहे. उपचारा अभावी शेवटी एका महिला रुग्णाला आपला जीव गमवावा लागला. इथल्या कोविड रुग्णालयात एक महिला शुक्रवारी दाखल झाली. कोरोनाबाधित असल्याने तिची ऑक्सिजन पातळी खालावली होती. व्हील चेअरवर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यावर तिचे नातेवाइक ऑक्सिजनची आणि तातडीच्या उपचाराची मागणी करीत होते. पण उपस्थित डॉक्टर किवा कर्मचार्यांनी तिला दाखलही करून घेतले नाही. आरडाओरड केल्यानंतर तासाभरानंतर तिला बेड मिळाला तोपर्यंत फार उशीर झाला होता.

शेवटपर्यंत तिला ऑक्सिजन मिळू शकला नाही, आणि तिचा मृत्यु झाला. शासकीय कोविड हॉस्पिटलमधील कोविड हॉस्पिटवर अनेकदा टीका केली. लोकानी असंतोष व्यक्त केला. इतकेच नाहीतर संतप्त नातेवाइकांनी हॉस्पिटल वर दगडफेक सुद्धा केली आहे. तरीही यातून कोणतीही सुधारणा हॉस्पिटल व्यवस्थापन करत नाही. अशा अव्यव्यस्थेमुळे लोकांचे जीव जात आहे. शुक्रवारी झालेल्या या महिलेचा मृत्यु हा त्यापैकीच आहे. अशा डॉक्टरवर कारवाई करावी. आणि इतर रुग्णांचा जीव वाचवावा, अशी मागणी महिलेच्या नातेवाईकांनी केली आहे.


जिल्ह्यातील जनतेची काळजी घेण्याकरिता कोरोना सेंटर वर डॉक्टर उपलब्ध करा. चंद्रपूर जिल्ह्यात डॉक्टर कमी आहे. काही डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांना उपचार वेळेत मिळत नाही. त्यासाठी लवकरात लवकर चंद्रपुर जिल्ह्यात डॉक्टर उपलब्ध करून द्यावी. अशी मागणी जोर धरत आहे