(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) स्वप्निल मंडोगडे डोंगरहळदी तुकुम, पोंभुर्णा
पोंभुर्णा:- स्थानिय चिंतामणी काॅलेज ऑफ काॅमर्स, पोंभुर्णा जि. चंद्रपुर येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादुर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी उपस्थित काॅलेजचे प्राचार्य डाॅ. टि. एफ. गुल्हाने फोटोला हार अर्पन करुन शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांना संबोधित करत म्हटले, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा विचार अर्पण करा. सत्य आणि अहिंसा मार्गाचा अवलंब करा. अहिंसेच्या मार्गाने आपण कोणती पण लढाई जिंकू शकतो असे ते संबोधून म्हणाले. या कार्यक्रमात उपस्थित प्रा. उपर्वट, डाॅ. मेश्राम, प्रा. सोनोने उपस्थित होते. तर कार्यक्रम आयोजक प्रा. बुधे, श्री. अनंतुलवार, श्री. कटकमवार. श्री. पराग, श्री. राहुल व इतर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.