१ लाख १० हजार ६०० रुपयांचा प्रत्येकी ठोठावला दंड.
Bhairav Diwase. Oct 18, 2020
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राकेश एम गोलेपल्लीवार जिबगांव, सावली
सावली:- तालुक्यातील वैनगंगा नदीच्या पात्रातून अवैध रित्या रेतीचे उत्खनन करून खुलेआम अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ची संख्या ही दिवसेंदिवस वाढत असल्याचे पाहून १४ ऑक्टोबर रोजी पहाटे ४ वाजताच्या सुमारास वैनगंगा नदीच्या साखरी घाटातून अवैध रेतीचे अवैध रेतीचे वाहतुक करणाऱ्या चार ट्रॅक्टर ला पकडल्याने रेती माफियांचे धाबे दणाणले आहे . या चारही ट्रॅक्टर ला सावली तहसील कार्यालयात जमा केले असून प्रत्येकी १ लाख १० हजार ६०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला असून त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. सावली तालुक्यातील साखरी, सामदा , अंतरगाव घाटातून सद्या रोजच ट्रॅक्टर ने अवैध रित्या चोरी करण्याचा प्रकार समोर येत आहे. सावली तहसीलला शासकीय कर्मचारी कमी आहे आणि त्यातच सद्या कोविड च्या कामात सर्वच जण व्यस्त असल्यामुळे याच संधीचा फायदा घेत अवैध रेती माफियांनी सावली तालुक्यात धुमाकूळ घालायला सुरुवात केली. या अवैध बाजाराच्या अनेक तक्रारी सावली तहसीलदार यांचा कडे झाल्या. या संदर्भात अनेकदा प्रत्यक्ष अधिकारी घाटावर गेले मात्र अधिकारी जात आहे ही माहिती लीक झाली अन अवैध रेती माफियांचा नेटवर्क मूळे एकही गाडी मिळाली नाही . त्यामुळे यावेळी तहसीलदार परीक्षित पाटील यांनी नियोजन करीत नायब तसीलदार सागर कांबडे, मंडळ अधिकारी कावळे , सावली तलाठी सांगूळले , हरंबा तलाठी झिटे यांना सोबत घेऊन साखरी च्या घाटावर रात्रौभर थांबले आणि पहाटे ४ च्या सुमारास ४ ट्रॅक्टर साखरी घाटातून अवैध रेती आणत असतांना त्यांना पकडले . ही माहिती इतर वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांना माहिती होताच जवळपास १५ हुन अधिक ट्रॅक्टर ह्या परत बोलविल्याची माहिती पुढे येत आहे. तहसीलदार पाटील व नायब तहसीलदार कांबडे यांनी केलेल्या कारवाई मुळे अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले असून जप्त केलेले ट्रॅक्टर वर १ लाख १० हजार ६०० रुपये प्रत्येकी दंड ची कारवाई करण्यात आल्याची माहिती तहसीलदार पाटील यांनी दिली .
"वैनगंगा नदीच्या साखरी व इतर घाटावरून अवैध रित्या रेती ची वाहतुक होत असल्याच्या तक्रारी आम्हाला मिळाल्या त्यावरून आज पहाटे च्या सुमारास साखरी घाटावर ४ ट्रॅक्टर पकडले व त्यांचा वर कारवाई करण्यात आली आहे.तसेच पुढेही ही कारवाई सुरू राहणार असून वेळ प्रसंगी गुन्हे ही दाखल करणार आहे."
परीक्षित पाटील तहसीलदार सावली