शिवसेना राजुऱ्याच्या मध्यस्थीने कुटुंबाला 1 लाख रोख तर मुलाला डेली वेज स्वरूपात रोजगार देण्याचे आश्वासन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- राजुरा तालुक्यात वाघाची दहशत चालूच आहे. खांबाला येथील एका शेतकऱ्याला जागीच ठार करून त्याचा शरीराचे तुकडे तुकडे करण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच राजुरा शिवसेनेचे पदाधिकारी बबनराव उरकुडे, राजू डोहे, निलेश गंपावार, उमेश गोरे, बाळू कुईथे, यांनी अधिकारी विकेश कुमार गलगट यांच्याशी चर्चा करून पीडित कुटुंबाला अंत्यविधीसाठी 1 लाख रोख रक्कम आणि मुलगा देवानंद मारोती पेंदोर (33) याला वनविभागाच्या माध्यमातून रोजगार देण्याचे आश्वासन देण्यात आले आणि त्या वाघाला लवकरात लवकर बंदीस्थ करणार असल्याची माहिती त्यांनी दिली..