(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- शहरी व ग्रामीण भागातील वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा व वीज ग्राहक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन विश्रामगृह राजुरा येथे वीज वितरण कंपनी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता यांच्याशी बैठक आयोजित करून राजुरा मतदार संघातील विद्युत विभागाची प्रलंबित व दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करून जनतेची होत असलेली गैरसोय दूर करावी अशा सूचना राजुराचे आमदार सुभाष धोटे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्यात.
राजुरा शहर व ग्रामीण भागातील वीज वारंवार खंडित होण्यामुळे जनतेची गैरसोय होत आहे. अखंडित वीज पुरवठा करून जनतेची गैरसोय दूर करण्याच्या दृष्टीने वीज वितरण व्यवस्था दुरुस्त करणे अतिशय गरजेचे आहे. कृषी पंपाच्या वीज जोडणीसाठी शेतकरी सोलर योजनेकरीता आकर्षित नसल्याने जवळपास असलेल्या रोहित्रावरून नवीन कृषी पंपाचे वीज पुरवठा जोडण्यात यावे. अहेरी 33 केव्ही उपकेंद्र तातडीने सुरु करून पाचगाव, पांढरपौनी परिसरातील वीज जोडणी या उपकेंद्रावर जोडण्यात यावी. ३१ मार्च २०१८ पर्यंतची कृषी पंपाची वीज जोडणी पूर्ण करून १ एप्रिल २०१८ नंतरची सुध्दा वीज जोडणी तातडीने पूर्ण करण्यात यावी. बिरसा मुंडा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजने अंतर्गत च्या लाभार्थ्यांना तातडीने वीज जोडणीचे डिमांड देण्यात यावे. शहरातील व ग्रामीण भागातील सिंगल फेजचे थ्री फेज करण्यात यावे. रोहीत्रांची दुरुस्ती करण्यात यावी. राजुरा व विरूर जंगल व्याप्त परिसरात वाघाची दहशत असल्याने शेतकऱ्यांना दिवसाचा विद्युत पुरवठा देण्यात यावा. राजुरा शहरी विभागाचे कार्यालय बामनवाडा येथून राजुरा येथे स्थलांतरीत करावे. शेतकऱ्यांच्या कृषी पंपाचे वीज पुरवठा तातडीने पूर्ण करण्यात यावे. अशा सूचना आमदार सुभाष धोटे यांनी वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
या प्रसंगी राजुराचे नगराध्यक्ष अरुण धोटे, वीज वितरण विभागाचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे, अधीक्षक अभियंता संध्या चिवंडे, कार्यकारी अभियंता महेश तेलंग, वीज वितरण विभागाचे सहाय्यक कार्यकारी अभियंता कातकर, लोहे, इंदुरीकर, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, सभापती मुमताज जावेद, कोरपना सभापती सौ. रुपाली तोडासे, राजुरा उपसभापती मंगेश गुरुनुले, नगर सेवक हरजित सिंग, गजानन भटारकर, आनंद दासरी, प. स. सदस्य तुकाराम मानुसमारे, रामदास पुसाम, माजी जिल्हा परिषद सदस्य उत्तम पेचे, शिताराम कोडापे, माजी सभापती, सदस्य स्याम रणदिवे, माजी उपसभापती, सदस्य संभाजी कोवे, बाजार समिती संचालक अविनाश जेणेकर, सुरेश मालेकर, भाऊराव चौव्हाण, साईनाथ बतकमवार, नंदकिशोर वाढई, रंजन लांडे, घनश्याम नांदेकर, संजय तोडासे, शैलेश लोखंडे, धनराज चिंचोलकर, इर्शाद शेख, सुभाष राऊत इत्यादी उपस्थित होते.