Click Here...👇👇👇

....... या कालावधीतील सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व (Online / offline) परीक्षेला स्थगित.

Bhairav Diwase

अभ्यासक्रमनिहाय नविन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रकाशीत होईल.
Bhairav Diwase.      Oct 05, 2020

गडचिरोली:- सकाळपासून गोंडवाना विद्यापीठाचा गोंधळ सुरू असुन आज सकाळी 9:00 वाजता ऑनलाईन पद्धतीने सुरु होणारी पदव्युत्तर पदवी परीक्षेच्या अंतिम वर्षाची परिक्षा सर्व्हर खराब असल्याने तांत्रिक अडचणींचे कारण देऊन दुपारी 2:00 पर्यंत पुढे ढकलण्यात आली होती.

मात्र मुळातच गोंडवाना विद्यापीठाचे तंत्र बिघडले असल्याने शेवटी पुन्हा एकदा तांत्रिक कारण पुढे करून आजची परीक्षा रद्द करून पुढे घेण्यात येणार असल्याचे विद्यापीठच्या परिक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ अनिल चिताडे ह्यांनी जाहिर केले आहे. मा. कुलगुरू तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्याशी चर्चा करून दिनांक ०५/१०/२०२० ते दिनांक ११/१०/२०२० या कालावधीतील सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा ( Online / offline ) स्थगित करण्यात आली आहे.


गोंडवाना विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयातील सर्व प्राचार्य, विद्यार्थी व संबंधितांना कळविण्यात येते की, उन्हाळी -२०२० च्या अंतिम वर्षाच्या / अंतिम सत्राच्या परीक्षा दिनांक ०५/१०/२०२० पासून नियोजित होत्या.

       मात्र वेळेवर तांत्रिक अडचण उद्भवल्याने होवू घातलेल्या दिनांक ०५/१०/२०२० च्या Online परीक्षा नियोजित वेळेनुसार घेता आलेल्या नाहीत. सदर तांत्रिक अडचण दुर करून परीक्षा सुरळीत सुरू करण्याबाबत मा. कुलगुरू तसेच विविध महाविद्यालयांचे प्राचार्याशी चर्चा करून दिनांक ०५/१०/२०२० ते दिनांक ११/१०/२०२० या कालावधीतील सर्व अभ्यासक्रमाच्या सर्व परीक्षा ( Online / offline ) स्थगित करून पुनर्नियोजीत करण्यात आलेल्या आहेत. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या नियमित परीक्षा दिनांक १२/१०/२०२० पासून सुधारित वेळापत्रकानुसार पुर्वीच्याच पध्दतीने घेण्यात येतील. व अभ्यासक्रमनिहाय नविन वेळापत्रक विद्यापीठाच्या संकेतस्थळावर लवकरच प्रकाशीत करण्यात येईल याची सर्व संबंधितांनी नोंद घ्यावी .