नकोडा येथे सात वर्षीय बालकावर चाकुने हल्ला करणाऱ्या आरोपीस अटक.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 26, 2020
चंद्रपूर:- २५ नोव्हेंबर रोजी नकोडा परिसरातुन आरोपी हरिदास बबन वानखेडे यास अटक करण्यात आली. चंद्रपुर न्यायालयात हजर केले असता तुरुंगात रवानगी करण्यात आली आहे.

२४ नोव्हेंबर रोजी सकाळी १०:३० वाजता दरम्यान आरोपी हरिदास बबन वानखेडे रा. नकोडा याने फिर्यादी सौ.अरुणा सफरजीत पासवान (२९) रा. नकोडा हि घरी असतांना हिच्या घरात घुसुन अश्लील शिविगाळ करुन भाजीपाल्याच्या चाकुने हातावर वार केला व तिच्या सात वर्षीय लहान बालकाच्या गालावर चाकुन वार करून गंभीर जखमी केले.
आरडाओरडा केला असता नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व घुग्घुस पोलिसांना माहिती देण्यात आली. जखमी अवस्थेत बालकास व महिलेला प्रा.आ.केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले फिर्यादी महिलेच्या तक्रारी वरुन घुग्घुस पोलीस ठाण्यात कलम ४५२,३२३,३२४,५०४ व ५०६ गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ला करून आरोपी फरार झाला असुन घुग्घुस पोलीस कसुन शोध घेत आहे.
दोन दिवसापूर्वी आरोपी हरिदास वानखेडे यांनी आपल्या आई सोबत भांडण केले अरुणा पासवान घरा शेजारी राहत असल्याने तिने भांडण सोडवुन हरिदास वानखेडेच्या आईला आपल्या घरी ठेवले होते. हाच राग मनात ठेऊन हरिदास वानखेडे ने अरुणाच्या सात वर्षीय बालकावर व तिच्यावर चाकुने हल्ला करून गंभीर जखमी केले.