वरूर रोड येथील युवकांनी साजरा केला सविधान दिन.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- जगतगुरू तुकोबाराय सार्वजनिक वाचनालय वरूर रोड येथे सविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मिळून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लीहलेल्या भारतीय संविधान या विषयावर समीक्षा जीवतोडे, श्रुती बोरकर, राजन भांडेकर या विद्यार्थ्यांनी आपले विचार व्यक्त केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, तो जो पिईल तो वाघ बनून गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणून बाबासाहेब यांनी शिक्षणाला change agents of society असे म्हटले होते.
यावेळी भारतीय संविधानाचे महत्त्व विशाल शेंडे यांनी विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. त्यानंतर प्रास्ताविकेचे वाचन वाचनालयातील सर्व विद्यार्थ्यांनी मिळून केले. ह्या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना पथकाचे स्वयंसेवक विशाल शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे आभार प्रवीण चौधरी याने मानले.