चंद्रपूर:- शनिवारला सायंकाळी ४:३० वाजता दरम्यान घुग्घुस येथुन जवळच असलेल्या व्हाईट हाऊस, तिलक नगर येथील राहना-या प्रमोद गोविंदराव हरडे (५४) हे बाजार करण्यासाठी बाहेर जात असतांना एक कामगार रस्त्यावर लघवी करत असतांना हटकले.
ते सायंकाळी ५:३० वाजत परत बाजार करुन घरी येत असतांना रस्त्यावर अडवुन हाथाबुक्क्यांनी मारहाण करने सुरु केले.
मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नीस व दोन मुलास व एका इसमाला बेदम मारहाण करण्यात आली.
जबर मारहाणी नंतर हरडे यांनी कुटुंबसह व संतप्त परिसरातील नागरिकांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली.
हि बातमी वा-यासारखी पसरताच घुग्घुस भाजपा शहराध्यक्ष विवेक बोढे, माजी उपसरपंच नकोडा हनिफ मोहम्मंद, यांनी घुग्घुस पोलीस ठाण्यात धाव घेतली व आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. ठाण्यात मोठी गर्दी जमा झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. फिर्यादी प्रमोद गोविंदराव हरडे यांच्या तक्रारी वरुन कलम ३२४,३२३,५०४,५०६ गुन्हा दाखल करुन आरोपी संजयकुमार हनुमानप्रसाद गौतम (२५) लेखराम रामखिलावन यादव (२३) हरिराम शिवबच्चन यादव (४२) नानमोहन हरिलाल कश्यप (१९) सर्व रा. व्हाईट हाऊस, तिलक नगर यांना रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.
घुग्घुस हे औद्योगिक क्षेत्र असल्याने याठिकाणी मोठ मोठ्या कंपन्या आहे. त्यामुळे कामासाठी परप्रांतीय कामगार येथे मोठ्या प्रमाणात आलेले आहे.
बातमी संकलन:- पंकज रामटेके