Click Here...👇👇👇

दुपट्यावरून "जॉनी"ने शोधला आरोपी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 08, 2020
चंद्रपूर:- श्वान पथकामार्फत आरोपीचा शोध घेतला जाते. मात्र निराशाच हाती पडल्याचे आजवर पुढे आहे. असे असताना चंद्रपूरातील श्वान पथकात असलेल्या श्वानाने दुपट्यावरून खुनाच्या आरोपीचा २४ तासात शोध घेण्यास महत्त्वाची भूमिका बजावली. या श्वानाचे नाव जाॅनी असून तो त्याने आयपीसी (इंडियन पीनल कोर्ट)चे प्रशिक्षण घेतले आहे. तो जर्मन शेफर्ड प्रजातीचा आहे. जाॅनीने पडकलेल्या आरोपीचे नाव भारत राजू मडावी (३२) रा. जलनगर वार्ड चंद्रपूर असे आहे. आरोपीला न्यायालयाने १५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रशांत माहुरकर हे गुरुवारी सायंकाळी हातात बॅग घेवून जात असताना प्रियदर्शिनी चौकाजवळ चोरट्याने बॅग हिसकावली.

यावेळी दोघामध्ये हातापायी झाली. चोरट्याने त्यांना पुलावरुन खाली ढकलले. प्रशांत माहुरकर यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. घटनास्थळावर त्यांना टुप्पटा आढळून आला.

पोलिसांनी लगेच श्वान पथकाला प्राचारण केले. पोलीस हवालदार उत्तम आवळे हे जाॅनी नावाच्या श्वानाला घेऊन आले. जाॅनीने दुपट्याचा गंध सुंगला आणि लालपेठकडे धाव घेतली. त्या परिसरात काही संशयित आढळले.

घटनास्थळावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील दृश्य बघितले. नंतर श्वान पथकाद्वारे ओळख परेड घेण्यात आली. यावेळी जाॅनीने नेमके भारत मडावीला हेरले. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली. शनिवारी न्यायालयात हजर केले घटनेचा तपास रामनगर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन राजगुरु करीत आहे.