🙏🙏 ✍️🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

"आ. सुधीरभाऊ हम आपके दिवाने".

आ. सुधीर मुनगंटीवार, "बस नाम ही काफी है".
आ. सुधीर मुनगंटीवार, "बस नाम ही काफी है". जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने,सलग सहाव्यांदा विजयी प्राप्त करुन जनतेचा बुलंद आवाज बनून लोकनेते आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत दमदार एंट्री केली आहे.२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-सेना महायुतीचा झालेला दमदार विजय बघून दुस-यांदा महायुती सत्तास्थानी असणार हे सर्वसामान्यांचा अंदाज शिवसेनेच्या विश्वासघातामुळे चुकला आणि वेगळे राजकीय समीकरण महाराष्ट्राच्या इतिहासात कोरला गेला.तेव्हाच आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपाने राज्याला आणि विशेषता चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाला चालना देणारे व्यक्तीमत्व मंत्रीमंडळात नसतील याचे दुःख झाले.

            राज्यात वेगळे राजकीय समीकरण जुळवून शिवसेना-राष्ट्रवादी-काॅग्रेस या तीन पक्षांचा सरकार स्थापन झाले.जनतेच्या मनाविरुद्ध बिघाडी सरकार स्थापन झाल्या नंतर काही महिन्यातच जगाला हादरवून सोडणारा कोरोना चा महाभयंकर संकट उभा राहिला. महाराष्ट्रात मुंबई, पूणे तसेच नागपूर या व्यतिरिक्त इतर काही जिल्ह्यात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात शिरकाव होत असतानाच चंद्रपूर जिल्ह्यात तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ.कुणाल जी खेमणार आणि पोलिस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांचा असलेला प्रशासकीय कार्याच्या दांडगा अनभुवातून नियोनात्मक बैठका घेवून जिल्ह्यातील जनतेची काळजी घेणारे एकमेव जागरुक लोकप्रतिनिधी म्हणजे आ. सुधीर मुनगंटीवार हे आहेत.

पराभव झाला म्‍हणून लाजायचे नाही व विजय झाला म्‍हणून माजायचे नाही.......

            लोकप्रतिनिधी म्हणून जनतेप्रती असणारे कर्तव्य काय असतो याचे उत्तम उदाहरण घ्यायचे असेल तर आ. सुधीर मुनगंटीवार यांचा नाव राजकीय क्षेत्रात अग्रस्थानी ऐकायला मिळतो. कोरोना अतिशय झपाट्याने वाढल्यामुळे करण्यात आलेल्या लाॅकडाऊन मध्ये चंद्रपूर जिल्हा वासियांनी संवेदनशील मनाचा, आपुलकीचा ओलावा देणारा, आपल्या सोबतीला कायम असणारा "सच्चा साथी" म्हणून सुधीर मुनगंटीवार यांच्या विविध सेवाभावी कार्याच्या माध्यमातून अनुभवले आहेत.लाॅकडाऊनच्या काळात भरभटलेला कामगार वर्ग, ऑटोरिक्षा चालक आणि समाजातील अत्यंत गरीब गरजूंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहत त्यांच्या सेवेसाठी आ.सुधीर मुनगंटीवार यांनी आपली चमू कामाला लावली.
               माझ्यासाठी सत्ता महत्त्वाची नसून गोरगरीबांचा कल्याण हेच एकमेव ध्येय हे सुत्र गेल्या ३५ ते ४० वर्षाच्या राजकीय जीवनात अवलंब करणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताकारण बाजूला ठेवून जनतेच्या कठिण प्रसंगात मदतीचा हात पूढे करुन "सत्ता असो अथवा नसो, सदैव तुमच्या सोबतीला" हा विश्वास जिल्ह्यावासीयांच्या मनात रुजविलेला आहे. लाॅकडाऊनच्या काळात शहरी भागात कामगार वर्गांना, गरीब गरजूंना डब्बे पोहचविणे, श्रीराम धान्य कीट वाटप तसेच जनतेच्या सुरक्षितेसाठी मास्क, सॅनीटायझर वाटप तसेच समाजाच्या रक्षणासाठी काळजी घेणारे पोलीस बांधव, वैद्यकीय अधिकारी, नर्सेस, आशा वर्कर, विविध सेवाभावी संस्थातील "कोरोना योध्दांच्या" सुरक्षितेसाठी सुरक्षा कवच म्हणून पीपीई किट उपलब्ध करुन दिले. एवढेच नव्हे तर सार्वजनिक ठिकाणी अर्थात प्रशासकीय कार्यालयात, ग्रामीण शासकीय रुग्णालय, विविध ग्रामीण भागात ऑटोमॅटीक सॅनीटायझर मशीनची व्यवस्था करुन देत सुधीर मुनगंटीवार यांनी सामाजिक दायित्व जोपासले आहेत.
               आ. सुधीर मुनगंटीवार यांचे कार्य एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पुरग्रस्त भागाचा स्व:ता दौरा करुन खचलेल्या बळीराजाला, रस्त्यावर आलेल्या अनेक कुटुंबांना "रडायचं नाही तर आपल्याला लढायचे आहे" असे धीर देवून त्यांना मदतीत कसल्याही प्रकारची कमतरता भासणार नाही याची दक्षता घेत मोठा आधार दिले.पुरानी हाती आलेला बळीराजाचा घास हिरावून घेतले तर कुणाचे संसार उपयोगी वस्तू, काही जणांचे घर उध्वस्त झाले. अश्या नैराश्याच्या प्रसंगात आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतलेला पुढाकार पुरग्रस्तांना नवचैतन्य देवून गेला.
          🆘 आ. सुधीर मुनगंटीवार म्हटले तर सेवाभावी कार्य करण्यासाठी सदैव पूढे "जीवनात थांबायचे नाही तर पूढे चालत राहायचे" त्यांच्या मनात सतत दुरदृष्टी विचार सुरू असतात त्याचे उदाहरण म्हणजे नुकतेच सुरू करण्यात आलेल्या प्रार्थनास्थळांचा, भाजपाच्या आक्रमक भुमिकामुळे राज्य सरकारने मंदिरे खुली करण्याचे आदेश दिले. आ. सुधीर मुनगंटीवार यांनी स्व:ता चंद्रपूरची आराध्य दैवत माता महाकाली मंदिरात जावून पूजा अर्चा केली. मंदिरे सुरु झाली परंतु तेथे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची विशेष काळजी म्हणून आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपले दायित्व समजून चंद्रपूरातील दैवत माता महाकाली मंदीर, श्री.साईबाबा मंदिर, श्री.गजानन मंदिर, श्री.माता कन्याका मंदिर येथे ऑटोमॅटीक सॅनीटायझर मशीन तात्काळ उपलब्ध करुन दिले.
     एक जागरुक लोकप्रतिनिधी म्हणून समाजाप्रती असणारे कर्तव्य आणि दुरदृष्टी विचारातून समाजहित जोपासणारे आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या बद्दल जनतेचा जिव्हाळा अधिक वृद्धिंगत होत चाललेला आहे. त्यामुळेच बालगोपालापासून ते युवक वर्ग म्हणा किंवा वृध्द व्यक्ती आ. सुधीर मुनगंटीवार यांचे फॅन असून "सुधीरभाऊ हम आपके दिवाने" म्हणत त्यांचे नेहमी कौतुक करीत असतात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत