विकासाचे दुसरे नाव सुधीरभाऊ..... #Chandrapur #MLASudhirbhau #birthdayArticle

सुधीरभाऊ म्हणजेच प्रगतीचा राजमार्ग....

चंद्रपूर आणि विदर्भातील स्थानिकांना भेडसावणाऱ्या ज्वलंत प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आपली उभी हयात पणाला लावणारा द्रष्टा नेता म्हणजे सुधीरभाऊ.. भाऊंनी आपल्या मतदारसंघात केलेली असंख्य विकास कामे चंद्रपूर सह महाराष्ट्राच्या सुधारणा आणि विकासाच्या पाऊलखुणाच म्हणाव्या लागतील. बेरोजगार तरुणांना नोकरी व रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. महिलांना स्वयंरोजगारासाठी संधी निर्माण करून सामाजिक उपक्रमाची जोड आणि जनकल्याणाचा वसा जोपासला आहे. #Chandrapur #MLASudhirbhau #birthdayArticle

पुढच्या शंभर वर्षात आठवण राहील अश्या पद्धतीचा विकास त्यांनी चंद्रपूर जिल्ह्याचा केला, त्यामध्ये विशेषत्वाने सैनिकी शाळा , वन अकादमी, बोटॅनिकल गार्डन , बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्र , नियोजन भवन , कोषागार भवन अभ्यासिका, वसतिगृहे, प्राथमिक आरोग्य केंद्र, जिल्हा क्रीडा संकुल,वनविभागाची देखणे विश्रामगृहे,इको पार्क, होत असलेले मेडिकल कॉलेज,कॅन्सर हॉस्पिटल, दाताळा पूल,प्राथमिक आरोग्य केंद्र, पोलीस ठाण्याच्या इमारती अश्या कितीतरी प्रकारे चंद्रपूरच्या वैभवात त्यांनी अर्थमंत्री पदाच्या काळात भर टाकली आहे.
संजय गांधी निराधार योजना..... श्रावणबाळ योजना..... या योजनेत विधवा... अपंग.. परित्यक्ता महिला तसेच वृद्ध व निराधारांना मिळणारे ६०० रूपये अनुदानात वाढ करुन ते प्रत्येकी १००० करण्याचे धोरण केवळ सुधीरभाऊंमुळेच राबविण्यात आले आहे. भाऊंची मंत्रीपदाची एकुणच कारकीर्द महाराष्ट्रातील आम जनतेच्या हितासाठीच उपयोगी ठरली आहे.. आमदार... राज्याचे अर्थ व नियोजन आणि वनमंत्री म्हणून त्यांनी अनेक मोठे प्रकल्प योजना चंद्रपूर सह राज्यासाठी आणल्या आहेत. राज्याचा नैसर्गिक समतोल टिकविण्यासाठी आणि ओसाड माळरानावर आणि ओजाड झालेले वनक्षेत्र हिरवाईने नटविण्यासाठी आपल्या वनमंत्री पदाचे कारकिर्दीत ५० कोटी वृक्षलावगड करण्याचा संकल्प करत शासन धोरण ठरविले. तीन वर्षांत 50 कोटी वृक्षारोपण करून त्यांनी महाराष्ट्राचे वनसंपदेत भर घातली..

दांडगा जनसंपर्क हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.. कितीही कामाचा व्याप असला तरी सुधीर मुनगंटीवार साहेब महाराष्ट्रच्या कानाकोपर्यातून कुणाचाही आलेला फोन नेहमी उचलतात , एखादी रिंग गेली भाऊंनी फोन उचलला नाही तर दिवसभरात मी सुधीर मुनगंटीवार बोलतोय बोला काय अडचण आहे असा फोन आलाच म्हणून समजा,सतत लोकांमध्ये मिसळून त्यांच्या समस्या काय आहेत ते जाणुन घेतात. दिवसभर शेकडो लोक आपल्या अडचणी घेऊन प्रत्यक्ष भाऊंना फोन करतात पण प्रत्येकासोबत तितक्याच ऊर्जेने संवाद साधतात, दिवसभर अनेक कार्यक्रम करूनही एकही फोन दुर्लक्ष करत नाही हा त्यांचा मनाचा मोठेपणा ही त्यांची विशेषतः

शेतकऱ्यांना नेहमीच झुकते माप देणारे आणि त्यांचे शेतीविषयावर अभ्यास असणारे देशातील काही प्रमुख नेत्यांपैकी सुधीरभाऊ देखील एक आहेत. महाराष्ट्रातील सिंचन क्षेत्रात वाढ व्हावी या करीता हजारो कोटी रुपयांची तरतूद त्यांच्या अर्थसंकल्पात केली. सिंचन, कृषी, रोजगार, स्वयंरोजगार, पाणीपुरवठा व राज्यात पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी त्यांनी त्यांच्या प्रत्येक अर्थसंकल्पात भरीव आर्थिक तरतूद करून आपली सत्ता ही पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या अंत्योदयाचा विचार करणारी आहे हे दाखवून दिले.

विकासकामांची जंत्री मांडायची म्हटलं तर पानेच्या पाने लिहून काढावी लागतील... त्यांनी प्रकाशित केलेल्या विकासाच्या पाऊलखुणा... या पुस्तकावर नजर टाकली तर त्यांच्या विस्तृत अशा कार्याची कल्पना येते. त्यांच्या विशेष प्रयत्नातुनच गोसे खुर्द प्रकल्पातुन आसोला मेंढा सिंचन प्रकल्पाला पाणी मिळाल्यानेच जवळपास १ लाख ४५ हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येऊ शकले आहे. *याच* गोसे खुर्दच्या उजव्या कालव्यामुळे आज चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी, नागभिड, सिंदेवाही, सावली, चिमुर, मुल, पोंभुर्णा तालुक्यातील हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी पाणी मिळत आहे.

मामा तलाव पुनर्जीवित करण्याचे हाती घेतलेले काम..
चिंचडोह बँरेज अंतर्गत चंद्रपूर मधील २८ गावे व गडचिरोली जिल्ह्यातील ४३ गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या योजना होऊन येथील ११५१० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊ शकले आहे. पळसगांव, आमडी उपसा जलसिंचन योजनेमुळे परिसरातील १० गावातील शेती सिंचनाखाली आली आहे.
बल्लारपूर तालुक्यातील शिवणी चोर सिंचन प्रकल्प व भिवकुंड नाला पुनर्जीवन प्रकल्पाचे कामासाठी भाऊंनी विशेष प्रयत्न केले आहेत.

मुल तालुक्यातील चिंचाळासह सहा गावांसाठी सिचन योजना राबविली. नलेश्वर मध्यम प्रकल्पातील मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाबरोबरच भसबोरण लघु प्रकल्पाचे दुरुस्ती साठी देखील प्रयत्न केले आहेत.
पिपरी दिक्षीत, जानाळा, मोलझरी लघू प्रकल्पाची तसेच मुल येथील मालगुजारी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधीची तरतूद देखील केली आहे,यामधून त्यांची पाण्याचा प्रश्न किती गंभीरपणे हाताळला होता हे दिसून येते.

चंद्रपूर येथे राष्ट्रीय पातळीरची वन अकादमी, आगझरी येथे बटरफ्लाय गार्डणची उभारणी. विसापूर येथे बांबू हँडीक्राफ्ट अँन्ड आर्ट युनिट, डायमंड कटिंग सेंटर सुरू करून चंद्रपूर जिल्ह्यात अनेक चांगले प्रकल्प आणलेत आणि युवकांच्या रोजगाराच्या संधी उपलब्ध करण्यास सुधीरभाऊंनी भरीव कामगिरी केली.

सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचे सारखे नेते हे फक्त त्यांचा जिल्हा विभागच नाही तर सबंध महाराष्ट्रात अनुकरणीय व्यक्तीमत्व म्हणून गौरविले गेले आहेत, त्यांच्या कामाची दखल राज्यभरातील नागरिकांनी घेतली आहेच, परंतु देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा त्यांचा गौरव केला असे हे व्यक्तिमत्त्व आहे.

मराठी भाषेत एक म्हण आहे की घार उडते आकाशी तिचे लक्ष पिलांपाशी... या म्हणीप्रमाणे भाऊंचे ग्रामीण कार्यकर्त्याकडेही फार विशेष लक्ष्य असते , मी सन 2014 मध्ये भाऊंना भेटण्याची इच्छा व्यक्त केली, मी आदरणीय भाऊ कडे गेलो, माझी ती पहिलीच भेट होती पण मी नेहमीचाच कार्यकर्ता आहे. या पद्धतीने मला त्यांनी वागणूक दिली, पाहिलीच भेट फार अविस्मरणीय झाली, भाऊ मला ओळखत होते, हे ऐकून मीच स्तब्ध झालो, ग्रामीण कार्यकर्त्याकडे भाऊंचे विशेष लक्ष्य असते या पहिल्या भेटीत जाणवलं.

सुधीरभाऊंचा ३० जुलै चा जन्मदिवस त्यांच्या वर विलक्षण प्रेम करणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो कार्यकर्त्यांचे दृष्टीने एक पर्वनीच ठरतो आहे.. हा वाढदिवस दिन महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या आनंदात भर घालणारा ठरो... आदरणीय सुधिरभाऊंचा वाढदिवसाचा आनंद द्विगुणीत होऊन त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस भरती येवो... भाऊंना व त्यांच्या परिवाराला सुख समाधान आणि आणि उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या स्वप्नातील महाराष्ट्र उभा होवो हीच सदिच्छा.

श्रीकांत मलोझलवार
भाजपा, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख चंद्रपूर.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या