🙏🙏🏏 VIVO IPL MATCH LIVE SCORE 🏏🙏
🟥 ✍️

🙏 🙏🙏


 🌾किसान कृषी केंद्र🌾

⭕प्रोप्रा. शुभम प्रकाश बेजंकीवार
📍भारत चौक, राजुरा जि. चंद्रपूर
📞मो. नं. 7875822001, 9822565394
🙏🙏

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार (माजी मंत्री तथा अध्यक्ष, लोखलेखा समिती, म.रा.) यांचा वाढदिवसाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन. #Jivati

जिवती तालुक्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीचे पदाधिकारी सरपंच, उपसरपंच, व सदस्य यांना निरोप समारोह कार्यक्रम.
जिवती तालुक्यातील 21 ग्रामपंचायतीचे 5 वर्षे कार्यकाळ 31 जुलै, 2021 रोजी पूर्ण होत; असल्याने व अद्यापही कोरोना संकटामूळे ग्रामपंचायतच्या सार्वञिक निवडणूक जाहीर न झाल्यामूळे जिवती तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्यात आले आहेत. कोरोना संकटात ग्रामपंचायतीचे सर्वच पदाधिकारी आपापल्या ग्रामपंचायतीचे विकासाभिमूख कार्ये पार पाडले आहेत, त्यानी केलेल्या कार्याची दखल घेऊन व विकासपुरुष सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मुदत संपलेल्या 21 ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच व सदस्यांना निरोप देण्याकरीता जिवती येथे निरोप समारोह चा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सदर कार्यक्रमास तालुक्यातील 21 ग्रामपंचायती सरपंच, उपसरपंच, सदस्य गण यांना निमंञित करण्यात येणार असून, त्यांना भेट वस्तू व शाल-श्रीफळ देऊन त्यांचा जिवती तालुक्याच्या वतीने दिनांक 30 जुलै, 2021 रोजी सकाळी 12.00 वा. जिवती येथील विदर्भ महाविद्यालयाच्या सभागृहात सत्कार करण्यात येणार आहे.