लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थ व नियोजन मंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा वाढदिवस देवाडा खुर्द - केमारा जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये विविध कार्यक्रम आयोजित. #Pombhurna


सतत जनकल्याणाचा विचार करत,विकासाचा ध्यास उराशी बाळगत लोकसेवा करणारे महाराष्ट्राचे लाडके नेते लोकलेखा समिती प्रमुख तथा माजी अर्थ व नियोजन मंत्री आ.सुधीरभाऊ मुनगंटीवार (30 जुलै) यांचा वाढदिवस देवाडा खुर्द-केमारा जिल्हा परिषद क्षेत्रात जिल्हा परिषद सदस्य श्री.राहुल संतोषवार हे लोकापयोगी सेवाभावी कार्यक्रम घेवून साजरा करणार. #Pombhurna

30 जुलै रोजी भारतीय जनता पार्टी च्या जेष्ठ नेत्यांचा सत्कार, सामाजिक, राजकीय, कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या वरिष्ठांचा सत्कार, जामतुकुम येथील गावातील वृध्द व्यक्तींना चालण्याकरिता वाकिंग स्टिक च्या काळ्याचे वाटप, उमरी पोतदार येथे कराटे टिम च्या संघाला खेळाच्या साहित्याचे किट  वाटप, पोंभुर्णा येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी वाचनालयामध्ये ग्रामीण व शहरी भागातील अभ्यासाकरिता येणाऱ्या मुलांना चहा ची  सुविधा व्हावी या उद्देशाने टी चहा मशीन चे लोकार्पण, मौजा गंगापूर नवीन येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना नोटबुक चे वितरण, उमरी पोतदार, आंबेधानोरा येथे पिण्याच्या पाण्याचे कॅन चे वाटप, बोर्डा दीक्षित, बोर्डा बोरकर, उमरी पोतदार  येथील जिल्हा परिषद शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करुन आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचा जन्मदिवस साजरा करण्यात येणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या