प्रबोधन विचार युवा मंच चंद्रपूर तर्फे लॉकडाऊन ज्ञान शाळा नोकारी(बू) येथे प्रबोधन तसेच विद्यार्थांना शालेय सामग्री वाटप बक्षिस वितरणाचा कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- कोरोना काळात गावातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे रखडते शिक्षण लक्षात घेऊन नोकारी गावातील युवा विदयार्थी तिलक पाटील याने गावात ज्ञानशाळा सुरू केली . या ज्ञानशाळेत मुलांच्या शिकवणी सोबतच विविध उपक्रम सुद्धा तो राबवितो आहे चंद्रपूर जिल्ह्यात सध्या नोकारीची ज्ञान शाळा चर्चेत आहे त्याचा च एक भाग प्राबोधन विचार युवा मंच चंद्रपूर झाले त्यांना गावात ज्ञान शाळा चालू आहे हे माहीत होताच त्यांनी ज्ञान शाळेला भेट दिली. ज्ञान शाळेत होत असलेल्या स्पर्धेला बक्षिस वितरण करण्यात आले 
प्रबोधन विचार युवा मंच चंद्रपूर चे मुख्य संयोजक मा. श्री विनोद सोनटक्के सर तसेच त्यांची संपूर्ण टीम नोकारी ज्ञान शाळेत येऊन प्रबोधन तसेच बक्षिस वितरण करण्यात आले 
या कार्यक्रमा प्रसंगी गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक तसेच ग्राम पंचायत चे उपसरपंच मा. श्री. वामन जी तुरानकर सर पोलिस पाटील मा. श्री. राकेश भाऊ भगत आशा वर्कर सारिका कांबळे टीपू सुलतान कमिटी चे अध्यक्ष मा श्री रियाज शेख व सर्व गावातील युवा विदयार्थी उपस्थित होते. प्रबोधन विचार युवा मंच ने सर्व विद्यार्थांना प्रबोधना द्वारे प्रोत्साहित केले शिक्षणाचे महत्त्व सांगितले.
या सर्व कार्यक्रमाचे सूत्र संचालन तिलक पाटील (शिक्षण मित्र) याने केले अतिशय चांगल्या प्रकारे कार्यक्रम यशस्वी झाला