पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील अतुल गव्हारे यांनी कृषी अर्थशास्त्र विषयात पीएचडी परिक्षेत भारतात आठवा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक.

Bhairav Diwase
आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पोंभुर्णाच्या वतीने शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) किशोर माहोरकर पोंभुर्णा
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यातील देवाडा खुर्द येथील अतुल गव्हारे यांची कृषी अर्थशास्त्र विषयात पीएचडी परिक्षेत भारतात आठवा आणि महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकावला आहे. याबद्दल आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा पोभुर्णाच्या वतीने शाल श्रीफळ व भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला. दुरध्वनी वरुन भाऊंनी कौतुक करत पुढील भविष्यासाठी अतुलला शुभेच्छा दिल्या. यावेळी पंचायत समिती सभापती, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष कु. अल्का आत्राम, भाजपा तालुकाध्यक्ष गजानन गोरंटीवार, पंचायत समिती उपसभापती सौ. ज्योती बुरांडे, पंचायत समिती सदस्य विनोद देशमुख, भाजयुमो तालुकाध्यक्ष अजय मस्के, राजु मोरे, मनोहर पा बुरांडे, दिलीप मँकलवार, अमोल मोरे, विनोद कानमपल्लीवार, दाशेट्टीवार भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते