चंद्रपुरात ओबीसी समाजाचा मोर्चा, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 26, 2020


चंद्रपूर:- २०२१ मध्ये ओबीसी समुदायाची जनगणना झाली पाहीजे. या प्रमुख मागणीसाठी चंद्रपूर येथे आज दि. २६ नोव्हेंबर रोजी संविधान दिनी ओबीसी समुदायाचा विशाल मोर्चा काढण्यात आला. आंबेडकर कॉलेज येथील दीक्षाभुमीवरुन मोर्चाला सुरुवात झाली.

चंद्रपूर जिल्ह्यात पहिल्यांदाच असा ओबीसी समाजांचा विशाल मोर्चा निघाला. लाखोंच्या संख्येने ओबीसी समाज सहभागी झाले होते.

मोर्चा चंद्रपूर शहरातील जटपुरा गेट मार्ग गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर सभा घेण्यात आली. मोर्चात जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातून ओबीसी समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.  ओबीसी मोर्चाला राजकीय पक्षातील ओबीसी नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. मोर्चात ओबीसींची जात निहाय जनगणना करण्यात यावी.

ओबीसींना शिक्षणात, नौकरीत आरक्षण मिळाले पाहिजे अशा घोषणा ओबीसी कार्यकर्ते देत होते. मोर्चात महिलासह युवक युवतींनी देखील मोठ्या संख्येत सहभाग घेतला. मोर्चासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त होता.