Bhairav Diwase. Nov 26, 2020
चंद्रपूर:- चंद्रपूर महानगरच्या वतीने पदवीधर निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीला प्रामुख्याने भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश महामंत्री शिवानी ताई दाणी, प्रदेश उपाध्यक्ष वामनजी तूरके, प्रदेश सचिव सोपानजी कनेरकर यांची उपस्थिती होती. भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगर जिल्हा अध्यक्ष विशाल निंबाळकर व भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांच्या मार्गदर्शनातं बैठक आयोजित करण्यात आली.
भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश महामंत्री शिवानी ताई दाणी या मार्गदर्शन करतांना म्हणाल्या की, युवा मोर्चाच संघटन हेच पदवीधर निवडणुकीला जिंकण्यासाठी मदत करणार व पदवीधर निवडणुकीचे अधिकृत उमेदवार संदीपजी जोशी हे निवडणूक सुद्धा जिंकणार.
कार्यक्रमात भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू, महामंत्री सुनील डोंगरे, महामंत्री प्रमोद क्षीरसागर यांची उपस्थिती होती.
*कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजयुमो महामंत्री प्रज्वलंत कडू यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन भाजयुमो उपाध्यक्ष रुपेश चहारे यांनी केले.
कार्यक्रमाच आभार प्रदर्शन यश बांगडे यांनी केले. भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर महानगरचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते या बैठकीत उपस्थिती होती.