भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे आणि युवा ग्रुपचा पुढाकार.
बल्लारपूर:- बल्लारपूर:- बल्लारपूर शहरात बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त भाजयुमो जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे आणि मित्र मंडळाच्या माध्यमातून गोरगरीब व अत्यंत गरजू लोकांना ज्यांना निवाऱ्याची सुद्धा सोय नाही अशा लोकांना ब्लँकेटचे वाटप करून बिरसा मुंडा यांची जयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी समाजसेवेच्या कार्यात नेहमीच युवा ग्रुपचा पुढाकार राहिलेला आहे यावर्षी सुद्धा थंडी पासून बचावा करिता ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले.
यावेळी रेल्वे चौक, बस स्टँड चौक आणि शहरातील मुख्य मार्गावरील सर्व गरजूंना थंडीपासून संरक्षणासाठी ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे, त्याचबरोबर युवा नेते शिवाजी चांदेकर, आदित्य शिंगाडे, पियुष मेश्राम, अभिषेक सातोकर, राकेश मडावी, प्रेम भगत,वैभव येसंकर, प्रवीण मडावी यांची उपस्थिती होती.