भाजप महामंत्री कासंगोट्टूवार यांचेसह शेकडो कार्यकर्त्यांनी घेतले दर्शन.
चंद्रपूर:- शीख बांधवांचे श्रद्धास्थान असणारे तुकुम परिसरातील सुप्रसिद्ध गुरुद्वारा आज सोमवार(१६ नोव्हेंबर)ला,सर्व भाविकांसाठी खुले करण्यात आल्याने सर्वत्र आनंद व्यक्त होत आहे.
आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात व भाजप जिल्हाध्यक्ष(श)डॉ मंगेश गुलवाडे यांच्या नेतृत्वात महानगरातील विविध धार्मिक स्थळांना भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भेटी दिल्याने भाविकांत उत्साह संचारला.तुकुम येथील गुरुद्वारामध्ये भाजप महामंत्री व नगरसेवक सुभाष कासंगोट्टूवार यांनी अन्य पदाधिकाऱ्यांनी दरबारात हजेरी लावून दर्शन घेतले.
यावेळी भाजपचे प्रज्ञा बोरगमवार गंदेवार, मायाताई मांदाडे, वसंतराव धंदरे पाटील, मंजुश्री कासंगोट्टूवार, शीतल गुरनुले, सोपान वायकर, संजय कोत्तावर, अमोल तंगडपल्लीवार, विठ्ठल डुकरे, आकाश म्हस्के, डुकरे व उराडे ताई यांची उपस्थिती होती.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील ९ महिण्यापासून सर्व धार्मिक-प्रार्थनास्थळं बंद होती. ती उघडण्यासाठी भाजपने आंदोलन केले होते. अखेर राज्य सरकारला जाग आली.
यावेळी सुभाष कासंगोट्टूवार म्हणाले,हा देश ईश्वरीय शक्ती मानणारा देश आहे. आशीर्वाद आणि कृपा यावर आमचा विश्वास आहे. आता कोरोनाचे युद्ध आम्ही नक्कीच जिंकू. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तुकुम परिसरातील गुरुद्वारा येथे अरदास, कीर्तन व करथान करण्यात आले. गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष जसबीरसिंग बोपाराय, विक्रमजीतसिंग, सुखवंतसिंग, सरबतसिंग, रविंदरसिंग, संजीवसिंग चावला यांनी महत्वाची भूमिका बजावली.