चिमूर तालुक्यातील बेलारा येथील घडली घटना.
(आधार न्यूज नेटवर्क सहसंपादक) अरविंद राऊत, चिमूर
चिमूर:- चिमूर तालुक्यातील ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या शेजारी असलेल्या बेलारा येथील प्रमोद रामचंद्र जीवतोडे या विवाहित युवकाचा शेतातील सौरऊर्जा (सोलर मशीनच्या) ताराला करंट लागल्याने मृत्यू झाल्याची घटना आज दिवाळीच्या दिवशी उघडकीस आली. यामुळे दोन मुले पोरके झाले आहे या घटनेने गावात हळहळ पसरली.
शेतीच्या संरक्षणाकरिता विद्युत करंट लावत असताना शेतकऱ्याचा जागीच मृत्यू.
गोंडपिपरी तालुक्यातील गोजोली येथील घटना.
बेलारा येथील प्रमोद रामचंद्र जीवतोडे यांने दि १३ नोव्हेबरला दिवाळी निमित्तचा बाजार करून घरी आला. आणि सायंकाळी ६ वा दरम्यान तो आपल्या शेतात गेला असता तेव्हा रात्रीचे ९ वाजले तरी तो परत न आल्याने कुटुंबातील लोकांनी शेतात जाऊन शोध घेत असताना सौरऊर्जेचा (सोलर मशीन) चा तार पाया ला लटकून मृतावस्थेत पडून दिसला नंतर चिमूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले होते. प्रमोदची पत्नी यापूर्वी मृत्यू पावली असल्याने त्याची दोन लहान लहान मुले दिवाळीच्या दिवशी अनाथ झाली असून बेलारा गावात शोककळा पसरली आहे.
दिवाळीच्या शुभेच्छा जाहिरात पहा