वाढीव वीजबिल संदर्भात महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात होणाऱ्या आंदोलन मध्ये जनतेनी सहभागी व्हावे:- भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांचे आव्हान.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Nov 22, 2020

चंद्रपूर:- महाराष्ट्राचे विकासपुरुष लोकनेते माजी पालकमंत्री आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार व माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर यांच्या मार्गदर्शनात तसेच चंद्रपूर भाजपा जिल्हाध्यक्ष(ग्रामीण) मा.देवरावजी भोंगळे, जिल्हा अध्यक्ष (महानगर) डॉ. मंगेशजी गुलवाडे, महापौर राखी ताई कांचार्लवार, महिला जिल्हाध्यक्ष अंजली ताई घोटेकर यांच्या नेतृत्वात सोमवार दि. 23 नोव्हेंबर 2020 रोजी सकाळी ठीक 11:00 वाजता गांधी चौक येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने लॉकडाउन च्या काळात बेकायदेशीररीत्या अतिरिक्त दिलेल्या विद्यृत बिलाची होळी करण्याचे आंदोलन करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने सर्व चंद्रपूर जिल्हातील जनतेच्या उपस्थितीमध्ये वीज बिलाची होळी करून या निष्क्रिय महाराष्ट्र सरकारचा निषेध करण्यात येणार आहे. तरी या चंद्रपूर शहर महानगरातील तमाम जनतेला आव्हान आहे की मोठ्या संख्येने आपल्या हक्कासाठी घराच्या बाहेर निघा आणि या निष्क्रिय सरकारच्या विरोधात होणाऱ्या आंदोलनात सहभागी व्हा असे आव्हान भारतीय जनता युवा मोर्चा चंद्रपूर जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी केले.