चंद्रपूर:- घुग्घुस येथील गांधी चौकात हिंदू ह्रदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.
स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले व त्यांच्या रांगोळीचे रेखाचित्र काढण्यात आले होते. यावेळी मान्यवरांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवनावर प्रकाश टाकला.
यावेळी घुग्घुस शिवसेना शहरप्रमुख बंटी घोरपडे, युवासेना तालुकाप्रमुख हेमराज बावणे, माजी ग्रापं सदस्य प्रभाकर चिकनकर, शिवसेना नेते बाळु चिकनकर, सतिश देवतळे, राकेश जयस्वाल, वेदप्रकाश मेहता, अजय जोगी, गणेश शेंडे, बाळु ठाकरे, युवासेनेचे चेतन बोबडे, महेश शेंडे, उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन घुग्घुस शिवसेना व युवासेनेच्या वतिने करण्यात आले होते.