(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- आ. किशोर जोरगेवार यांच्या सततच्या पाठपूराव्याला यश आले असून विधानसभा क्षेत्रातील विविध विकास कामांसाठी 5 कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यामूळे आता शहरातील विविध विकासकामांना गती मिळणार आहे.
कोरोना संकटामूळे अनेक नवनिर्मीत विकास कामांवर घाला आला. असे असले तरी चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विकास कामांसाठी आ. जोरगेवार यांचा सातत्याने पाठपूरावा सुरु होता. याचाच परिणाम म्हणून आता चंद्रपूर विधानसभा क्षेत्रातील विकासकांसाठी 5 कोटी 66 लक्ष रुपयांच्या खनिज विकास निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली. या खनीज विकास निधीतून चंद्रपूर येथील दूध डेअरी ते चांदा फोर्ट रेल्वे स्टेशन रोडच्या झरपट नाल्यावर बंधा-यासह पुलाचे बांधकाम करण्यात येणार आहे, तसेच लालपेठ जूनी वस्ती येथील रोडचे रुंदीकरण व कॉक्रीट रोड – नालीचे बांधकाम करण्यात येणार आहे. यासह चंद्रपूर विधानसभा क्षेत्रात विविध ठिकाणी सिंमेट बेंचेस लावणे, घूग्घूस येथील तेलुगू समाजभवनाचे बांधकाम, साखरवाही येथे सिमेंट कॉक्रीट रोडचे बांधकाम, पठाणपूरा येथील बगीच्याच्या खूल्या जागेवर रंगमंच व खोलीचे बांधकाम, चांदा क्लब ग्राउंड येथील सभामंचाला ग्रीन रुमचे बांधकाम व वेंढली येथे पांदन रस्त्यासह खडीकरण इत्यादी कामे प्रस्तावीत आहे.