अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रीया तात्काळ थांबविण्यात यावी:- भाजप शिक्षक आघाडी.

Bhairav Diwase
Bhairav Diwase. Dec 23, 2020
चंद्रपूर:- दिनांक २४ डिसेंबर २०२० रोजी चंद्रपूर जिल्हयातील अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रीया राबविण्यात येत आहे. या समायवेजन प्रक्रीयेत मोठया प्रमाणात गोंधळ असून, त्यावर आक्षेप घेण्यात आलेले आहेत. प्राप्त आक्षेपावर योग्य ते निराकरण व निर्णय झाल्याशिवाय समायोजन प्रक्रीया राबविण्यात येवू नये.

       तसेच कोणत्याही शिक्षकांवर अन्याय होणर नाही याची काळजी मा. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) चंद्रपूर यांनी घ्यावी. अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी चंद्रपूर जिल्हा संयोजक गुरुदास कामडी, महानगर जिल्हा संयोजक प्रा. अरुण राहांगडाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रंजीव श्रीरामवार यांनी जिल्हा शिक्षणाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे केली आहे.
       
        शैक्षणिक सत्र २०१८-२०१ ९ नंतर आजपर्यंत अनेक शाळेत निवृत्तीमुळे वा अन्य कारणाने जागा रिक्त झालेल्या आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या आजच्या स्थितीनुसार समायोजन होऊन उर्वरित अतिरिक्त शिक्षकांची नावे अतिरिक्त शिक्षकांच्या यादीत समाविष्ट होणे आवश्यक असतांना, सुधारित नवीन अतिरिक्त शिक्षकांची यादी शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून घोषीत करण्यात आलेली नाही. 
        
        प्रत्येक समायोजन प्रक्रीया राबवितांना केवळ जूनीच यादी शिक्षणाधिकरी कार्यालयाकडून घोषीत करण्यात येत असून, शिक्षणाधिकारी कार्यालयाकडून अतिरिक्त शिक्षकांची दिशाभूल करण्यात येत आहे. अनेक शाळेतील अतिरिक्त असेलेल्या शिक्षकांची नावे समायोजन प्रक्रीयेत शिक्षणाधिकारी कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात येत असलेल्या यादीत त्यांची नावे समाविष्ट करुन घेतल्या जात नाहीत. ही अत्यंत गंभीर व अन्याय करणारी बाब आहे. यातून शिक्षणाधिकारी कार्यालयातील भ्रष्ट व भोंगळ कारभार दिसून येतो. असा आरोप भारतीय जनता पार्टी शिक्षक आघाडी चंद्रपूर जिल्हा संयोजक गुरुदास कामडी, महानगर जिल्हा संयोजक प्रा. अरुण राहांगडाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रंजीव श्रीरामवार यांनी केला आहे.
        
         इयत्ता ६ ते ८ चे समायोजन करीत असतांना विषयांची निकड लक्षात घेण्याची आवश्यकता नसतांना, फक्त सेवाजेष्ठता लक्षात घेऊन समायोजन करण्यात यावे. सेवाजेष्ठ शिक्षकांना न्याय देण्यात यावा. नव्याने अतिरिक्त शिक्षकांची यादी घोषीत करावी. त्यानंतरच समायोजनाची प्रक्रीया राबविण्यात यावी. गैरमार्गाचा वापर करुन संस्थांतर्गत समायोजन करण्याची परवानगी दिलेल्या संबंधितावर कार्यवाही करण्यात यावी. मा. शिक्षणाधिकारी यांनी कोणतीही कार्यवाही केलेली नाही. तर गैरमार्ग व भ्रष्टाचाराला चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. संबंधित अतिरिक्त शिक्षक व शाळेला पाठीशी घालण्याचा शिक्षणाधिकारी माध्यमिक जि. प. चंद्रपूर यांचेकडून प्रयत्न केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणाची तात्काळ चौकशी करुन दोषींवर कार्यवाही करण्यात यावी. समायोजन प्रक्रीया तात्काळ थांबविण्यात यावी. अशी मागणी भाजपा शिक्षक आघाडी चंद्रपूर जिल्हा संयोजक गुरुदास कामडी, महानगर जिल्हा संयोजक प्रा. अरुण राहांगडाले, प्रदेश कार्यकारिणी सदस्य रंजीव श्रीरामवार, गणेश तर्वेकर, अरविंद राऊत, प्रा. पुजाराम लोडे, प्रफुल राजपुरोहीत, श्रीकांत कुमरे, प्रा. स्नेहल बांगडे, मोहन कुकडपवार, सुनिल पाचखेडे, महादेव बारेकर, भाष्कर राऊत, प्रविण पिंपळकर, विनोद गुडधे, किरण वाडीकर, गणपत चौधरी, अरुण शेंडे, अशोक बुरले, प्रा. अनिल नानोटकर, पप्पू पिसाळकर, अविनाश कांबळे, एकनाथ थुटे, शरद गिरडे, जयंत गौरकर, संजय ठिकरे, अनिल झाडे, किशोर ठाकरे, बंडू बोढे, प्रा. राजेश गायधने, पुरुषोत्तम निभ्रड, रुपेश डोर्लिकर, प्रा.गणेश उगेमुगे, मोरेश्वर मस्के, प्रा. सुयोग वाळबुधे, भाष्कर तिजारे, शरद मासिरकर, दशरथ आसपवार, विशाल गावडे, शरद राजूरकर, अनंत डेहनकर, आदींनी केली आहे .