चंद्रपूर:- जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या घुग्घुस ग्रामपंचायतीच्या निवडणुका न घेता नगरपरिषद घोषित करून नगरपरिषदेच्या निवडणुका घ्याव्या अशी विनंती भाजपा पक्षा तर्फे करण्यात आली होती.
या नुसार ग्रामपंचायतीच्या निवडणुका न होता नगरपरिषद निवडणूक होणार आहे.
ग्रामपंचायतीचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या असत्या तर सरकारचा नाहक खर्च झाला असता. ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार नाहीत, लवकरच नगरपरिषद घोषित करून नगरपरिषदेच्या निवडणुका घेण्यात येतील..
ही बातमी कळताच घुग्घुस गावातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला.