भाजपा शिष्टमंडळाद्वारे तहसीलदार साहेबांना दिले निवेदन.
Bhairav Diwase. Dec 18, 2020
कोरपना:- कोरपना तालुका हा कापसाचा पट्टा म्हणून ओळखला जातो या ठिकाणी चांगल्या प्रतीचा कापूस पिकविला जातो येथील कापसाची मांग जवळच असलेल्या तेलंगाना व इतर राज्यात आहे परंतु कोरपना येथील सीसीआय कापुस केंद्रात अनागोंदी कारभार चालू असून शेतकऱ्यांना अपमानित करण्यात येत आहे शेतकरी आपला कापूस घेऊन जिनिंग मध्ये जातो गेल्यागेल्या ग्रेडर म्हणतो ये कहासे लाया कचरा,जल्द उठाले, ये चलेगा नही निकलता क्या पोलीस को बुलांऊ अशा धमक्या देऊन कापूस शेतकऱ्यांना अपमानित केल्या जात आहे व शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे आधीच नापिकी असल्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे तरी शासनाने त्वरित कारवाई करून अशा असभ्य वर्तन करणार्या सि सि आय ग्रेडरला निलंबित करण्यात यावे.
आदिवासी नेते गोदरु पाटील जुमनाके यांचे दुःखद निधन.
यावर्षी कापसाची पीकी कमी असल्यामुळे व बोंडअळीचा प्रभाव असल्यामुळे कापसाची प्रत 19,20 आहे आणि आज कापूस खाजगी जिनींग मालक कवडीमोल भावाने घेऊन कुठे टाकतो हेच एक कोडे आहे करिता शासनाने योग्य चौकशी करून सीसीआय ग्रेडरवर व इतर दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करून निलंबित करण्यात यावे अन्यथा भारतीय जनता पार्टी कोरपना तालुक्याच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी संविधानात्मक पद्धतीने तीव्र आंदोलन करू असा इशारा भारतीय जनता पार्टीचे श्री नारायण हिवरकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष,श्री केशवजी गिरमाजी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष जीवती, श्री सतीश उपलंचीवार शहराध्यक्ष गडचांदूर,श्री पुरुषोत्तमजी भोंगळे उपाध्यक्ष कोरपणा,श्री ओम पवार युवा मोर्चा जिल्हा सचिव कोरपना, श्री अनिलजी कौरासे, श्री कार्तीक गोडंलावार भाजप पदाधिकारी यांनी तहसीलदार साहेब यांना एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले.