राजुरा:- गोंडी भाषा मानकिकरण समीतीचे राष्ट्रीय सदस्य, 6 व्या गोंडी भाषा मानकिकरण वर्कशाप चांदागढ आयोजन समितीचे अध्यक्ष, गोंडवाना शिक्षण संस्था माणिकगड जिवती चे अध्यक्ष, आदिवासी सेवा सहकारी संस्था जिवती चे अध्यक्ष तथा गोंडवाना गणतंत्र पार्टी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष गोदरू पाटिल जुमनाके हे आज दि.18.12.2020 ला पहाटे 3.20 वा. अल्पशा आजाराने निसर्गाच्या पंचतत्वात विलीन झाले.
आदिवासी नेते गोदरु पाटील जुमनाके यांचीं प्रकृती कोरोनातून सावरल्यानंतर त्यांना इतर त्रास होऊ लागल्याने त्यांच्यावर नागपूर येथील अवंति हॉस्पिटल ला उपचार घेत होते. त्यांच्या अचानक जाण्याने समस्त आदिवासी समाजावर शोककळा पसरली आहे.
आधार न्यूज नेटवर्क परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐