वरोरा:- अखिल भारतीय विद्यार्थी परिषद हि जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना आहे. युवा वर्गाला सक्षम करणे, सकारात्मक विचार रुजवणे आणि समाजासाठी व देशहित कार्य करण्यास विद्यार्थी वर्गाला तयार करणे,असे राष्ट्रहित कार्य विद्यार्थी परिषद गेल्या ७१ वर्षापासून अविरतपणे करीत आहे. गेल्या महिन्या भरापासून ६६ व्या राष्ट्रीय अधिवेशनाची तयारी संपूर्ण भारतभर सुरु आहे. राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे विद्यार्थी परिषद चा उत्साह, ऊर्जा प्रदान व लघु भारत दर्शन देणारे आणि अभाविप ची पुढील दिशा व धोरण ठरवनारे अधिवेशन असते.
या अधिवेशना मध्ये संपूर्ण भारतभर असलेले कार्यकर्ते एकत्रित येऊन हे अधिवेशन साजरे होते. पण यावेळी करोना महामारी च्या पाश्वभूमीवर रेशीमबाग,नागपुर येथे नियमांचे पालन करीत २५ व २६ डिसेंबर २०२० ला कमी संख्याचे ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले. या कार्यक्रमाचे आभासी म्हणजे ऑनलाईन प्रक्षेपण सर्व भारतभर झाले. या माध्यमातून सर्व कार्यकर्ते लघु भारत अधिवेशना ला एकत्रित पणे अनेक स्थानावरुन ऑनलाईन जुळले होते. एक अनोखे अधिवेशन या वेळी बघायला मिळाले. असेच आभासी ६६ वे राष्ट्रीय अधिवेशन चंद्रपुर जिल्ह्यात पण ठीक ठिकाणी पार पडले.
वरोरा शाखेतर्फे लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालय वरोरा येथे आयोजित केले होते. सर्व नियंमाचे पालन करीत अतिशय उत्साही वातावरण मध्ये हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात दिप-प्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी प्रमुख उपस्थिती मा. सुनीलजी सरोदे (तालुका संघचालक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) व प्रमुख वक्ता म्हणून मा. अतुलजी पेचे (अभाविप पूर्व कार्यकर्ता) यांची उपस्थिती होती. त्यांनी विद्यार्थी परिषद आणि शैक्षणिक क्षेत्रात वाटचाल या विषयावर वक्तव्य करीत सर्वांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अभाविप वरोरा शाखा नगरमंत्री कु. तृप्ती गिरसावळे हिने मांडले तर कार्यक्रमाचे संचालन कु. स्वाती हनुमंते हिने केले. कार्यक्रमाचे गीत कु. संचाली बलकी हिने म्हटले तर मान्यवरांचा परिचय कु. नाझीया पठाण यांनी करून दिला . संपूर्ण कार्यक्रमावर नियंत्रण कु. पुजा येरगुडे व ओम हनुमंते यांनी केले. तर आभार प्रदर्शन कुणाल घुमे यांनी केले. या सोबतच प्रामुख्याने शकिल शेख, गणेश नक्षिणे, लोकेश रुयारकर, अंकित मोगरे , आकाश बावणे, अथर्व गवळी, रवी शर्मा, आदित्य गोरगाटे असे अभाविप वरोरा नगराचे कार्यकर्ते उपस्थित होते. या आभासी अधिवेशनाला अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी व पूर्व कार्यकर्ता आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते. सर्वांनी वरोरा नगराच्या उत्साही आयोजनाला दाद देत पुढील वाटचालीस मंगलमय शुभेच्छा दिल्या.