राजुरा:- राजुरा शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी राजुरा विधानसभेचे लोकप्रिय आमदार सुभाष धोटे यांनी कंबर कसली असून राजुरा येथे २ कोटी ६ लाख रुपयांचे विकासांचे भुमीपुजन आमदार सुभाष धोटे यांच्या हस्ते करण्यात आले. भारत चौक वार्ड येथे बगिचा सौंदर्यीकरण, पेठ वार्ड आणि जवाहर नगर येथे रस्ता कामांचे भूमिपूजन याप्रसंगी करण्यात आले.
या प्रसंगी नगराध्यक्ष सुनील देशपांडे, संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष साईनाथ बतकमवार, आरोग्य सभापती सौ.वज्रमाला बतकमवार , नगरसेवक हरजितसिंग संधू, आनंद दासरी, गजानन भटारकर, राधेश्याम अडानिया, मधुकर चिंचोलकर, दिलीप देरकर, सौ. शारदा टिपले, अभिजीत धोटे, विजय जांभुळकर, रवी जामुनकर यासह जवाहर नगर वार्ड , भारत चौक वार्ड, पेठ वार्ड येथील स्थानिक नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.