मतदान आवाहन; "मी मतदान केलं, तुम्ही पण करा ":- देवराव भोंगळे

⭕नागपूर पदवीधर निवडणूक मतदान सुरु.
⭕भाजप गड राखणार की काँग्रेस बाजी मारणार.
⭕आज मतदार ठरविणार उमेदवारांचे भवितव्य.

भाजपा जिल्हा अध्यक्ष देवरावजी भोंगळे व त्यांची पत्नी सौ, अर्चनाताई देवरावजी भोंगळे यांनी बजावला मतदानाचा हक्क.
Bhairav Diwase.        Dec 01, 2020
चंद्रपूर:- आज दि. 01 डिसेंबर 2020 रोज मंगळवारला नागपूर विभाग पदवीधर मतदान संघ निवडणुकीतील मतदानाचा दिवस आहे. सर्व मतादात्यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला सुरवात केली आहे.

        त्याचबरोबर चंद्रपुरचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टीचे जिल्हा  अध्यक्ष  श्री देवरावजी  भोंगळे  यांनी सुद्धा नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात आपलं मत देवून मतदानाचा अधिकार बजावला. सोबतच सर्व मतदात्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करून मतदारसंघात आपले योगदान द्यावे अशाप्रकारचे प्रतिपादन भाजपा जिल्हा  अध्यक्ष  मा. देवरावजी  भोंगळे  यांनी केले.


हे आहेत उमेदवार:-
नागपूर विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत १९ उमेदवार रिंगणात आहेत. अभिजित वंजारी ( भारतीय राष्ट्रीय काँग्रेस ), संदीप जोशी (भाजप), राजेंद्रकुमार चौधरी (रिपाई , राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी), अ‌ॅड सुनिता पाटील (इंडियन नॅशनल मानवाधिकार पार्टी), अतुलकुमार खोब्रागडे, अमित मेश्राम, प्रशांत डेकाटे, नितीन रोघें, नितेश कराळे, डॉ. प्रकाश रामटेके, बबन ऊर्फ अजय तायवाडे, अ‌ॅड .मोहम्मद शाकीर अ.गफ्फार, सिए. राजेद्र भुतडा, प्रा.डॉ.विनोद राऊत, अ‌ॅड. वीरेंद्र कुमार जयस्वाल, शरद जीवतोडे , प्रा.संगीता बढे, संजय नासरे(सर्व अपक्ष).

कोरोनाग्रस्तांसाठी चार वाजता मतदान:-
कोरोनाबाधित असलेल्या पदवीधर मतदारांना आपला मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी विभागातील सर्व मतदान केंद्रावर शेवटच्या एक तासांत विशेष सुरक्षेत मतदान करता येईल. दुपारी ४ ते ५ यावेळात मतदान केंद्रावर पीपीई किट पुरविण्यात आल्या आहेत. मतदान केंद्र अधिकारी यांनी सुरक्षेच्या सर्व खबरदारी घेऊन या मतदारांना मतदान करू शकतील.

अशी घेणार काळजी:-
मतदान केंद्रावर मास्क, रबरी हातमोजे, फेसशिल्ड, १५ पीपीई किट, मेडिसिन किट यामध्ये पॅरॉसिटॅमॉल यासह आवश्यक सर्व औषधांचा समावेश राहणार आहेत. थर्मल गन, हँण्ड सॅनिटयजर, साबण, सोडिअम हायपोक्लोरॉईड, आदींसह १५ आवश्यक साहित्य प्रत्येक मतदान केंद्रावर पुरविणार आहेत.


जिल्हानिहाय मतदार:-
विभागात दोन लाख ६ हजार ४५४ असून त्यापैकी १ लाख २ हजार ८०९ मतदार हे एकट्या नागपूर जिल्ह्यातील आहेत. नागपूर ग्रामीण २३ हजार ६८, भंडारा जिल्हा १८ हजार ४३४, गोंदिया १६ हजार ९३४, गडचिरोली १२ हजार ४४८, चंद्रपूर ३२ हजार ७६१.

मतदान केंद्र:-
नागपूर जिल्हा १६४, भंडारा जिल्ह्यांमध्ये ३१, गोंदिया जिल्ह्यामध्ये २१, वर्धा ३५, चंद्रपूर ५०, गडचिरोली २१ असे एकूण ३२२ मतदान केंद्र आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने