Top News

शेकडो कार्यकर्त्यांचा सेवा बंधन बांधून प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश.

नवनियुक्त जिल्हा संपर्क प्रमुख रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो तरुण व शेतकऱ्यांनी केला प्रहार पक्षात प्रवेश.

सेवा बंधन म्हणजे एखाद्या गरजू ला लागणारी सेवा हि प्रहार सेवका तर्फे पुरवली जाईल व जनतेची सेवा घडावी प्रत्येक कार्यकर्त्याला सेवा बंधन बांधून प्रहार परिवारात प्रवेश:- रुग्ण मित्र गजुभाऊ कुबडे चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सतीश बिडकर कोरपना
कोरपना:- नामदार बच्चूभाऊ कडू (शालेय शिक्षण, कामगार, जलसंपदा, महिला व बालकल्याण विकास राज्यमंत्री महाराष्ट्र् राज्य) यांचे सर्व सामन्याचे काम करण्याचे पाहून कोणताही मतभेद न ठेवता योग्य न्याय मिळवून देण्यात सक्षम नेतृत्व म्हणजेच नामदार बच्चू भाऊ कडू म्हणूनच तरुणांचा ओघ प्रहार कडे वाढत चालला नामदार बच्चू भाऊ कडू यांच्या आदेशानुसार पक्ष बांधणी व पक्ष विस्तारा संदर्भात रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांना चंद्रपूर गडचिरोली जिल्हा सम्पर्क प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आले.

व त्याच जोमाने रुग्णमित्र गजुभाऊ कुबडे यांनी जिल्ह्याचा आढावा घेत तालुका निहाय तीन दिवसीय दौऱ्या लावन्यात आला चिमुर, सिंदेवाही, बरम्हपुरी, नागभीड, चंद्रपुर, बल्लरशाह, गोंडपीरी, राजुरा, तालुक्याचा दौरा आटपून कोरपना जिवती तालुक्याची गडचांदूर येथे आढावा बैठक घेण्यात आली यात असंख्य युवक व शेतकरी यांनी प्रहार मध्ये सेवा बंधन बांधून पक्षात प्रवेश केला यातच अनेक राजकीय पक्षांना खिंडार पडले कुबडे याना जिल्हा सम्पर्क प्रमुख मिळाल्याने कार्यकर्त्यांन मध्ये उस्थाह पाहायला मिळाला व आता जोमाने पक्ष वाढीसाठी कामाला लागा असा सल्ला कुबडे यांनी कार्यकर्त्यांना दिला व मोलाचे मार्गदर्शन केले, यातच अनेक शेतकरी व , सामजिक संस्था यांनी आपल्या समस्या घेऊन नामदार बच्चू भाऊ कडू याना सम्पर्क प्रमुख गजुभाऊ कुबडे यांच्या मार्फत निवेदने देणायत आली कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून भासारकर साहेब, सतीश बिडकर, पंकज माणूसमारे, शैलेश विरुटकर, सागर गुड्डेलीवर, गणेश ठावरी, जीवन तोगरे, अफरोज अली, पारस सागोले, सुभाष राजूरकर, मारोती राजूरकर, सतीश महात्मे, अरविंद वाघमारे, असे असंख्य कार्यकरते उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पंकज माणूस मारे गणेश भाऊ, बाबू भाऊ यांनी परिश्रम घेतले 

      मा. नामदार बच्चू भाऊ कडू यांना डोळ्या समोर ठेवून युवक, शेतकरी, महिला वर्गणी प्रहार मध्ये येऊन राजकारण नाही तर सेवा बंधन बांधून समाजाची सेवा करण्यास प्रहार मध्ये सामील व्हा असे आव्हान प्रहार सेवक सतिश बिडकर यांनी केले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने