रोडगुडा ता. जिवती येथे हनुमान मूर्ती स्थापना व कळस स्थापनेचा कार्यक्रम संपन्न.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- अतिदुर्गम भागातील जिवती तालुक्यातील रोडगुडा येथे हनुमान मूर्ती स्थापना व कळस स्थापनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्या कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष बंजारा समाजाचे धर्मगुरू प्रेमसिंग महाराज तर प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष देवरावदादा भोंगळे , उपसभापती महेश देवकते हे उपस्थित होते त्या कार्यक्रमात हनुमान मूर्तीचे स्थापना करण्यात आली कलसपूजन करून स्थापना केल्यानंतर बंजारा समाजाचे आराध्य दैवत डॉ संत रामराव महाराज व गोदरूजी पाटील जुमनाके यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

      याप्रसंगी धर्मगुरू प्रेमसिंग महाराज यांनी समाजाला संदेश देत समाज हिताचे काम करावे असा संदेश दिला.प्रास्ताविकपर महेश देवकते यांनी तालुक्यातील विविध समस्यांना वाचा फोडली तर देवराव भोंगळे यांनी आदरणीय सुधीर भाऊंच्या नेतृत्वाखाली रामराव महाराज च्या आशिर्वादाने बंजारा समाजाच्या सदैव पाठीशी राहून समाजहितासाठी सदोदीत प्रयत्नशील राहु हा शब्दच समाजाला दिला मुळात बंजारा समाज हा अतिशय मेहनती व संघर्ष शील असल्याबाबत गौरवोद्गार बोलताना काढले. सोबतच प्रेमसिंग महाराजांनी समाज प्रगतीसाठी व्यसनमुक्त राहून वाटचाल करण्यासाठी मोलाचा संदेश दिला.

       यावेळी जेष्ठ नेते गोपीनाथ जी चव्हाण, सुभाषजी पवार, युवा नेते राजेश राठोड, राजेश हरि राठोड,चंदर नाईक राठोड, बळीराम राठोड,भारत चव्हाण,मोहन राठोड,व्यंकटी राठोड,माधव सुदाम पवार व समस्त गावकरी मंडळी उपस्थित होते.