भारतीय जनता पार्टी चे आधारस्तंभ भारतरत्न स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी गोंडपिपरी शहर तर्फे ब्लॅंकेट वाटप.

Bhairav Diwase



(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) अमित उइके, गोंडपिपरी
गोंडपिपरी:- श्रद्धेय भारतरत्न माजी पंतप्रधान स्व अटल बिहारी वाजपेयी जी यांच्या जयंती निमित्त गोंडपीपरी शहर येथे सफाई महिला कामगार यांना ब्लॅंकेटचे वितरण व ग्रामीण रुग्णालयात फळ वाटप करण्यात आले


         तसेच महिलांनतर्फे ग्रामीण रुग्णालय येथे सोनोग्राफी सेंटर उघडण्यात यावा व महिला डॉक्टर ची नियुक्ती करण्यात यावा या करिता निवेदन अरुणा ताई जांभुळकर भाजपा शहर अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले
  या कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा, भारतीय जनता महिला आघाडी, भारतीय जनता विद्यार्थी आघाडी चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.