पाटण-टाटाकोहाड रस्त्यावर झाला अपघात; दोन जण गंभीर जखमी.

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) सुनिल राठोड, जिवती
जिवती:- पाटण-टाटाकोहाड रस्ता खराब झाल असल्याने रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे याच रस्त्यावरून दोन बाईकस्वार जात असताना गाडी खड्यात गेल्याने तोल सांभाळता आले नाही व यातच एकाच पाय गेला असुन दुसऱ्याची मान व कबंरला जबरदस्त मार बसला आहे या मुलांना आर्या दि बेस्ट युनियन पब्लिक ॲक्याडमी चे पोलिस भरती ची तयारी करणारे मुलं अनिल राठोड, गणेश डुकरे, सचिन पवार, प्रविण पवार हे मुलं आपली ईव्हेंट करुन येत असताना रस्ता कडाला पडलेल्या जखमी अवस्थेतुन नितेश प्रकाश शिंदे व आकाश विश्वनाथ कनकटले यांना पाटण येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र पाटण रुग्णालयात एकही डॉ उपलब्ध नसल्याने गडचांदुर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात रात्री 7.30 च्या सुमारास घडला असुन ग्रामीण रुग्णालय गडचांदुर येथे उपचार सुरू आहे