निवासी उप जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) वैभव एनपल्लीवार, चंद्रपूर
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यात सि.सि.आय. मार्फत कापूस खरेदी मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शेतकरी कापूस घेवून जिनिंग ला गेल्यावर कापूस गाडीतून उतरविण्यासाठी येणारा खर्च त्या शेतकऱ्यांकडून घेतला जातो. याबाबत केंद्र शासनाच्या भारतीय कपास निगम लिमी.,(सिसिआइ्र्र) यांनी सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांना कापूस उतराई मजूरांचा खर्च जिनिंग प्रेसिंग दरात आधिच समाविष्ट करण्यात आलेला आहे. तरीसुद्धा चंद्रपूर जिल्ह्यात जिनिंग फॅक्ट्री द्वारा शेतकऱ्यांकडून कापूस उतराई चा खर्च घेण्यात येत असल्याचे लक्षात येताच पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांचे मार्गदर्शनात भारतीय जनता पार्टी चे जिल्हा किसान आघाडी प्रमुख श्री. राजू घरोटे यांचे नेतृत्वात शिष्टमंडळाने निवासी उप जिल्हाधिकारी श्री. गव्हाळ यांची भेट घेवून निवेदन दिले व सदर बाब लक्षात आणून तात्काळ कार्यवाही करण्याबाबत चर्चा केली.
यावेळी राजू घरोटे म्हणाले की, सिसिआय च्या स्पष्ट सुचना असतानाही जिनिंग द्वारा शेतकऱ्यांकडून कापूस उतराई चा खर्च घेतला जातो ही बाब अत्यंत निंदनीय आहे. याबाबत प्रशासनाने सर्व कृषी बाजार उत्पन्न समित्यांना तात्काळ सुचीत करावे व शेतकऱ्यांवर बसणाऱ्या अधिकच्या आर्थिक भूर्दंडातून सुटका करावी. याप्रसंगी भाजपा ओबीसी आघाडीचे महानगर अध्यक्ष विनोद शेरकी, विकास खटी, तुषार मोहुर्ले, गंगाधर कुंटावार उपस्थित होते.