शासकीय लोकार्पण व भूमिपूजन सोहळा हायजॅक.

Bhairav Diwase
सोहळा वचनपूर्तीचा की भाजपच्या प्रचारसभेचा?
Bhairav Diwase. Dec 20, 20020
पोंभुर्णा:- पोंभुर्णा तालुक्यात विकासकामाचा धूमधडाका असल्याचा देखावा रचला जात आहे. यातच विविध विकासकामाचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा घेण्यात येत आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची रणधुमाळी व आदर्श काटेकोर आचारसंहितेचे निर्बंध असताना शासकीय लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला जाहीर सभेचे रूप देऊन शासकीय कार्यक्रम भारतीय जनता पार्टी पोंभुर्णा च्या नावाने हायजॅक करण्याचा घाट विकासपुरुषांच्या शिलेदारांनी रचला आहे.
 

     नगरपंचायतीच्या माध्यमातून करोडो रुपये खर्च करून आठवडी बाजार बांधण्यात आला त्याचे लोकार्पण तसेच खुले नाट्यगृह बांधकाम भूमिपूजन सोहळा दिनांक 22 डिसेंबरला होणार आहे. आठवडी बाजाराचे सात कोटी रुपये वैशिष्टपूर्ण निधीतून बांधकाम करण्यात आले तर चार कोटी रुपये खर्चून खुले नाट्यगृह बांधण्यात येणार आहे हे सर्व होत असताना शासकीय निमंत्रण पत्रिकेला बगल देत गुप्तपणे भाजपा कार्यकर्त्यांगणांना आमंत्रित करण्याकरिता व पक्षाचा बडेजावपणा दाखवण्याकरता प्रमुख उपस्थिती स्थानिक हवसे-गवसेना स्थान देत विविध विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन तसेच आ. सुधीर मुनगंटीवार यांची जाहीर सभा दर्शवित वचनपूर्ती च्या सोहळ्याला भारतीय जनता पार्टी पोंभूर्णा निमंत्रित करीत आहे.
        
    एकीकडे तालुक्याचा 27 ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत तर दुसरीकडे पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे पदाधिकारी निमंत्रित करण्यात आले आहे नगरविकास मंत्रालयाच्या सोहळ्यात ग्राम विकास मंत्रालयाचा समावेश निव्वळ प्रचार सभेकरिताच आहे. तर 29 नोव्हेंबरला मुदत संपलेल्या व सद्यस्थितीत प्रशासक असलेल्या नगरपंचायत मध्ये नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांना पदाचा मोह सुटला नसल्याचेही पत्रिकेतून दिसून येत आहे. शासकीय लोकार्पण व भूमिपूजन सोहळ्याला हायजॅक करून सोळा वचनपूर्ती चा दर्शवून भाजपच्या प्रचार सभेचे रूप देण्यात आले आहे.

सदर कार्यक्रम शासकीय असून माननीय जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून पालकमंत्री खासदार व आमदार यांना निमंत्रित करण्यात आले आहे आदर्श आचारसंहितेचा भंग नव्हता कार्यक्रम घेण्याचे निर्देश असून या उपर कोणी पत्रिका छापले असतील तर ते चुकीचे आहे.
::-सिद्धार्थ मेश्राम मुख्याधिकारी
सदर आठवडी बाजाराची बांधकाम पूर्ण झाले असून नगरपंचायत ला स्वाधीन केले आहे शासकीय पत्रिका छापण्यात आली आहे ती अजून वितरित व्हायची आहे.
::-मुकेश टांगले 
उपविभागीय अभियंता
सार्वजनिक बांधकाम विभाग
अशाप्रकारे शासकीय कार्यक्रम करण्याचा प्रयत्न होत असेल तर सदर कार्यक्रम उधळून लावण्यात येईल तसेच यांच्याविरुद्ध शासकीय कार्यक्रमाची चोरी करणाऱ्या भाजपावर गुन्हा दाखल करण्यात यावा.
::-अतिक कुरेशी 
माजी गटनेता
या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील व शहरातील निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राजकीय लाभ प्राप्त करण्याकरता शासकीय शासकीय यंत्रणेला वेठीस धरून रचलेले कारस्थान असून त्याच्यावर त्वरित गुन्हे दाखल करण्यात यावे अन्यथा कार्यक्रमच उधळून लावण्यात येईल.
::-आशिष कावटवार 
उपजिल्हा प्रमुख शिवसेना चंद्रपुर