भद्रावती:- अभियंता युवतीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याची घटना दि.१९ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजेदरम्यान येथील कटारिया ले-आऊटमध्ये घडली.
विहिरीत उडी घेऊन युवकाची आत्महत्या.
सोनाली सुरेश उईके (३२) असे मृतक युवतीचे नाव असून ती पुणे येथे विप्रो कंपनीत अभियंता म्हणून कार्यरत होती. घटनेच्या दिवशीच ती पुणे येथून सकाळी १० वाजता भद्रावतीला आली होती. दरम्यान, दुपारी ४ वाजेदरम्यान तीने घरीच छताच्या पंख्याला विद्युत इस्त्रीच्या केबलने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पोलिसांनी अकस्मात मृत्युची नोंद केली असून पुढील तपास सुरु आहे. सोनालीचे वडील सेवानिवृत्त वेकोली कर्मचारी आहेत.