पोंभुर्णा मार्गावरील चेक आष्टा फाट्याजवळील घटना.
पोंभुर्णा:- चिंतलधाबा येथुन दुचाकीवरून येत असलेल्या बाप-लेकांचा पोंभुर्णा-चिंतलधाबा मार्गावरील चेक आष्टा फाट्या जवळ अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार मुलाचा मृत्यू झाला तर वडील गंभीर जखमी झाले आहे. ही घटना शुक्रवारी ८ वाजताच्या सुमारास घडली.
सातारा कोमटी येथील प्रशांत कुळमेथे असे मृतकाचे नाव असून दिवाकर कुळमेथे असे जखमी वडिलाचे नाव आहे. चिंतलधाबा-पोंभुर्णा मार्गावर मागील काही महिन्यांपासून अपघाताचे प्रमाण सतत वाढत आहेत. दरम्यान कामानिमित्त वडील दिवाकर कुळमेथे व मुलगा प्रशांत कुळमेथे हे दोघेही बाहेरगावी गेले होते.
भद्रावतीत अभियंता युवतीची गळफास घेऊन आत्महत्या.
दुचाकीने ते आपल्या स्वगावी परतत असताना दुचाकीसमोर अचानक सारस प्राणी समोर आल्याने दुचाकीवरून नियंत्रण सुटल्याने तोल जावून दोघेही खाली पडले. यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली. जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालय पोंभुर्णा येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर हलविण्यात आले असता प्रशांत कुळमेथे यांना डाक्टरांनी तपासून मृत घोषित केले. वडील दिवाकर कुळमेथे यांच्यावर उपचार सुरू आहे. प्रशांतच्या मृत्युने सातारा कोमटी गावात शोककळा पसरली आहे.